Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Google Pixel Fold Launched: १२ जीबी रॅम सोबत गुगलचा फोल्डेबल फोन लाँच, पाहा किंमत

16

नवी दिल्लीः Google Pixel Fold Launched: Google Pixel Fold ला बुधवारी १० मे रोजी Google I/O 2023 इव्हेंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. अनेक लिक आणि अफवानंतर Google ने अखेर आपला पहिला फोल्डेबल डिवाइस (Google Pixel Fold Specifications) स्वतः डेवलप केलेल्या Tensor G2 SoC सोबत लाँच केला आहे. Google Pixel Fold फोल्डेबल डिवाइस (Google Pixel Fold Features) Android 14 वर काम करतो. यात (Google Pixel Fold Camera) ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. हा (Google Pixel Fold Price In India) 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज सोबत येतो. फोल्डेबल (Google Pixel Fold Battery) डिवाइस मध्ये 4,821mAh ची बॅटरी मिळते. पिक्सल फोल्ड (Google Pixel Fold Sale Date) ची टक्कर Samsung च्या Galaxy Z Fold सीरीज, OPPO Find N2 Flip आणि Huawei Mate X2 या फोनशी होईल.

Google Pixel Fold ची किंमत

Google Pixel Fold च्या 256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत $1,799 जवळपास १ लाख ४७ हजार ५०० रुपये पासून सुरू होते. 512GB स्टोरेजच्या मॉडलची किंमत $1,919 म्हणजेच जवळपास १ लाख ५७ हजार ३०० रुपये ठेवली आहे. फोनला ओब्सीडियन आणि पोर्सिलेन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. Google Pixel Fold फोन अमेरिकेत प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. पुढील महिन्यांपासून ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे. फोल्डेबल फोनला काही निवडक बाजारात विकले जाणार आहे. Google ने Google I/O कीनोट दरम्यान Pixel 7a वरून पडदा हटवला आहे. भारतात याची किंमत ४३ हजार ९९९ रुपये आहे. याला फ्लिपकार्टवरून विकले जाणार आहे.

Google Pixel Fold specifications

Google Pixel Fold मध्ये डुअल-सिम आहे. हे Android 14 वर काम करते. यात 6:5 आस्पेक्ट रेशियो, 380ppi पिक्सल डेंसिटी आणि 120Hz रिफ्रेश रेट सोबत 7.6-इंचाचा इंटरनल डिस्प्ले (1,840 x 2,208 पिक्सल) आहे. यात 5.8 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,092 पिक्सल) ओलेड आउटर डिस्प्ले आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 17.4:9 आहे. हा 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. बाहेरील डिस्प्ले मध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन आहे. तर आतील डिस्प्ले मध्ये प्लास्टिक कोटिंग दिले आहे. हे Google च्या Tensor G2 SoC वर काम करते. जो Titan M2 सिक्योरिटी चिप आणि 12GB LPDDR5 RAM सोबत येतो.

वाचा : WhatsApp Tricks: आता वीजेचं बिल भरणं झालं सोपं, व्हॉट्सॲपद्वारेही भरु शकता बिल, या स्टेप्स करा फॉलो

GooglePixel Fold मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट दिले आहे. ज्यात OIS (ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन), CLAF आणि f/1.7 अपर्चर चा 48-मेगापिक्सलचा प्रायमरी वाइड-एंगल लेंसचा कॅमेरा सेटअप मध्ये 10.8-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेराचा समावेश आहे. ज्यात 121-डिग्री फील्ड ऑफ व्यू आणि f/2.2 अपर्चर आहे. यासोबत 5x ऑप्टिकल झूम आणि 20x सुपर रेस झूम सोबत 10.8-मेगापिक्सलचा डुअल पीडी टेलीफोटो लेंस सुद्धा दिला आहे. Google Pixel Fold मध्ये सेल्फीसाठी 1.22 pm पिक्सल विड्थ, f/2.2 अपर्चर आणि फिक्स्ड फोकस सोबत बाहेरील डिस्प्लेवर एक 9.5-मेगापिक्सल सेंसर आहे. इसके फिक्स्ड फोकस सोबत 8-मेगापिक्सल कॅमेरा फिट केला आहे.

वाचाः WhatsApp Tricks: व्हॉट्सॲप वापरायची मजा आणखी वाढणार, फक्त या ट्रिक्स करा फॉलो

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.