Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

National Technology Day 2023 आज! ११ मे रोजीच का करतात साजरा?

15

नवी दिल्ली : National Technology Day 2023 Celebration : आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणजेच National Technology Day 2023 असून दरवर्षी हा दिवस ११ मे रोजीच साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या यशस्वी अणुचाचण्यांचे स्मरण म्हणून साजरा केला जातो. कारण ११ मे १९९८ रोजी Shakti-I या मिसाइलचं यशस्वीरित्या राजस्थानमधील पोखरण येथे प्रक्षेपण करण्यात आलं होतं. त्यामुळे आजचा दिवस भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या कामगिरीचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या विकासात या लोकांनी योगदान दिले आहे. १९९९ पासून दरवर्षी, तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) तांत्रिक नवकल्पनांचा सन्मान करून हा दिवस साजरा करते.

National Technology Day 2023 चा इतिहास

भारतीय शास्त्रज्ञांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या दिवसाला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून संबोधण्यास सुरुवात केली. ११ मे १९९८ रोजी भारताने राजस्थानमधील पोखरण येथील सैन्य चाचणी रेंजवर Shakti-I हे क्षेपणास्त्र यशस्वीपणे डागलं. यानंतर आणखी दोन अणुचाचण्या झाल्या ज्याने भारताला अणुऊर्जा राष्ट्रांच्या एलिट क्लबमध्ये आणलं. तसेच या दिवशी भारताने आपल्या पहिल्या स्वदेशी विमान हंसा-3 ची बंगळुरू येथून चाचणी घेतली होती.

वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

असा करतात National Technology Day 2023 साजरा
दरवर्षी, तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) एक विषय निवडते ज्यावर हा दिवस साजरा केला जातो. या वर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2023 ची थीम ‘स्कूल टू स्टार्टअप्स-इग्नाइटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट’ आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आपल्या जीवनात तंत्रज्ञानाच्या महत्त्वाच्या भूमिकेची आठवण करून देतो. या क्षेत्राची प्रगती आणि वाढ सुनिश्चित करण्यासाठी सतत गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण गोष्टींची गरज आहे. हे दाखवून देतो.

वाचा : वाचा : Google Pixel 7a लाँच होताच Pixel 6a झाला स्वस्त, तब्बल १७,००० हून अधिकची सूट

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.