Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mother’s Day Wishes in Marathi: मातृ दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी या संदेशांचा होईल उपयोग, वाचा आणि पाठवा

99

आई हा एकच शब्द आयुष्यभर जपून ठेवला, तरी काहीतरी राहतंय, अशीच जाणीव करून देणारा आहे. आकाशाचा कागद केला, समुद्राची शाई केली, तरी आईची महती लिहून पूर्ण केली जाऊ शकत नाही. आई मुलांवर संस्कार करते, शिकवते, स्वावलंबनाचे धडे देते; प्रसंगी मुलांसाठी वाटेल ते करायला ती तयार असते. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य अगदीच खरे आहे. ९ मे १९१४ रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा संमत करून घेतला. या कायद्यानुसार, मे महिन्याचा दुसरा रविवार मदर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो आहे. तेव्हापासून बहुतांश देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे म्हणून साजरा केला जाऊ लागला. भारतामध्येही मदर्स डे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आईचं ममत्व प्रत्येकाला कळतं, तिने खाऊ घातलेले नवनविन पदार्थ आणि न थकता सर्वांसाठी धडपडणं हे आईच करू शकते.

हॅपी मदर्स डे

“सगळे दिले मला आयुष्याने,
आता एकच देवाकडे मागणे,
प्रत्येक जन्मी मला
हिच आई मिळो
या पेक्षा अजून काय हवे”
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

“विधात्याची एक उत्तम कलाकृती तू
अशी कलाकृती
इतर कोणी निर्माणच करू शकत नाही
तुला शतश: प्रणाम आई”
हॅपी मदर्स डे

मातृ दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

मातृ दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

“आई म्हणजे माझा जन्म..!
मावशी म्हणजे ‘मी’ झाल्याचा आनंद..!!
आई म्हणजे पुस्तकाची गोड सुरुवात..!
मावशी म्हणजे पुस्तकाचा गोड शेवट
आई म्हणजे विठ्ठल..!
मावशी म्हणजे रखुमाई..!!
आई म्हणजे माझा विश्वास..!
मावशी म्हणजे माझा आशीर्वाद”
अशा आई आणि मावशीला
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

“गुतंलेले तुझे हात
नेहमीच व्यस्त असतात कामात,
तुझी अंगाई ऐकावया,
घेऊन येई रात्र,
मातृदिनाच्या शुभेच्छा”

“जगी माऊलीसारखे कोण आहे
तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे
असे हे ऋण ज्याचे व्याज नाही
या ऋणाविना जीवनास साज नाही
मदर्सडेच्या शुभेच्छा”

Mothers Day Wishes

mothers-day-wishes

“आई तुझ्या चरणी वैकुंठ धाम..
तूच माझा पांडुरंग
आई उच्चारानेच होईल सगळ्या वेदनांचा अंत.. “
मातृ दिनाच्या प्रेमळ शुभेच्छा!

“आई नावाची वाटते देवालाही नवलाई,
विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वत:ला विठाई
मातृ दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा”

मदर्स डे निमीत्त शुभेच्छा

मदर्स डे निमीत्त शुभेच्छा

“फक्त आईच भविष्याचा विचार करु शकते कारण ती
एका नव्या जीवनाला आयुष्यात आणत असते-
आई असते तुमची पहिली मैत्रीण, तुमची घनिष्ठ
मैत्रीण आणि कायमची एकमेव मैत्रीण..!!”
मातृ दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

“ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी “आई”.”
मातृदिनाच्या शुभेच्छा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.