Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष १९ मे २०२३ : शनैश्चर जयंती, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

10

राष्ट्रीय मिती वैशाख २९, शक संवत १९४५, वैशाख कृष्ण अमावस्या, शुक्रवार, विक्रम संवत २०८०, सौर ज्येष्ठ मास प्रविष्टे ५, शव्वाल-२८, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १९ मे२०२३, सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु. राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत.अमावस्या तिथी रात्री ९ वाजून २३ मिनिटापर्यंत त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ. भरणी नक्षत्र सकाळी ७ वाजून ३० मिनिटापर्यंत त्यानंतर कृतिका नक्षत्र प्रारंभ. शोभन योग सायं ६ वाजून १६ मिनिटापर्यंत त्यानंतर अतिगण्ड योग प्रारंभ.

चतुष्पद करण सकाळी ९ वाजून ३४ मिनिटापर्यंत त्यानंतर किस्तुघ्न करण प्रारंभ. चंद्र दुपारी १ वाजून ३५ मिनिटापर्यंत मेष राशीत त्यानंतर वृषभ राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-०४,
सूर्यास्त: सायं. ७-०६,
चंद्रोदय: पहाटे ५-३४,
चंद्रास्त: सायं. ६-५९,
पूर्ण भरती: दुपारी १२-०३ पाण्याची उंची ४.५८ मीटर, रात्री ११-४९ पाण्याची उंची ४.०० मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ५-२३ पाण्याची उंची ०.३७ मीटर, सायं. ५-५८ पाण्याची उंची १.६५ मीटर.

दिनविशेष: दर्श भावुका अमावास्या, श्री शनैश्चर जयंती.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५० मिनिटे ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३४ मिनिटे ते ३ वाजून ३९ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५७ मिनिटे ते १२ वाजून ३८ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून ६ मिनिटे ते ७ वाजून २६ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजून १७ मिनिटे ते १ वाजून ५९ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून १२ मिनिटे ते ९ वाजून ७ मिनिटापर्यंत राहील. यानंतर दुपारी १२ वाजून ४५ मिनिटे ते १ वाजून ४० मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : माता लक्ष्मीची पूजा करा आणि कनकधारा स्तोत्राचा पाठ करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.