Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गॅस सिलेंडर ५० रुपयांनी स्वस्त मिळवू शकता, ऑनलाईन बुकिंग करताना फक्त ‘या’ स्टेप्स करा फॉलो

16

नवी दिल्ली : Cashback on Gas Cylinder Booking : इंडेन, भारत, एचपी गॅस कोणत्याही कंपनीचा गॅस असो त्याची बुकिंग करताना एक खास पद्धत तुम्ही वापरली तुम्ही ५० रुपयांपर्यंत पैसे वाचवू शकता. एकीकडे गॅस सिलेंडरचे भाव वाढत असल्याने अशी कोणतीही सूट फारच फायदेशीर ठरु शकते. तर ही ऑफर सरकारद्वारे जाहीर केलेली नसून पेटीएम ही ऑफर आपल्या यूजर्सना देत आहे. जर तुम्हालाही या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर गॅस सिलिंडर बुक करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींचं पालन करावं लागेल. यानंतर तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. चला तर जाणून घेऊ गॅस सिलेंडर कसा बुक करू शकता..सर्वप्रथम तुम्हाला पेटीएम अॅप ओपन करावे लागेल. तुम्ही ते उघडताच संपूर्ण यादी तुमच्यासमोर उघडेल. कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला फोन नंबर टाकावा लागेल किंवा ग्राहक क्रमांक टाकावा लागेल. सर्व तपशील काळजीपूर्वक तपासल्यानंतर, तुम्हाला Apply Cashback & Offer वर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला ही ऑफर AU क्रेडिट कार्डवर मिळत आहे.

वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

AU क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर ५% झटपट सवलत उपलब्ध आहे. १००० रुपये किमान पेमेंट केल्यास तुम्हाला ५० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. अशा परिस्थितीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत जवळपास १,१०३ रुपये आहे आणि ही ऑफर मिळाल्यानंतर तुम्हाला थेट गॅस सिलेंडर ५० रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. तुम्हाला फक्त ही प्रक्रिया फॉलो करून पेमेंट करावे लागेल. म्हणजेच एकूणच तुम्हाला याचा मोठा फायदा मिळू शकतो. तसेच, येथून गॅस बुक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे येथून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कॉलिंग किंवा लाईनचा लावण्याचा त्रास होणार नाही.

वाचा : WhatsApp Tips: आता एकाच स्मार्टफोनमध्ये चालवू शकता दोन व्हॉट्सॲप अकाऊंट, फक्त या सोप्या स्टेप्स करा फॉलो

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.