Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

२६ हजारांचा Realme 10 Pro+ 5G फक्त २ हजार रुपयांना, Flipkart वर आहे भन्नाट ऑफर

12

नवी दिल्ली : बजेट ५जी स्मार्टफोन शोधणाऱ्यांसाठी रिअलमी कंपनीचा Realme 10 Pro+ 5G खूप चांगला पर्याय ठरू शकतो. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स मिळतात. जर तुम्हीही नवीन स्मार्टफोन शोधत असाल, तर तुमच्यासाठी realme 10 Pro+ 5G हा एक भारी पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे या फोनवर भारी डिस्काउंट ऑफर्सही सुरू आहेत, त्यामुळे तुम्ही हा फोन तुमच्या यादीत समाविष्ट करू शकता.

तुम्ही Flipkart वरून realme 10 Pro+ 5G (128GB+6GB RAM) ऑर्डर करू शकता. या फोनची मूळ किंमत २५,९९९ रुपये आहे आणि तुम्ही ७% डिस्काउंटनंतर फोन २३,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच यावर अनेक बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. HDFC बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास १२५० रुपयांची थेट सूट मिळू शकते. क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास १,००० रुपयांची वेगळी सूट उपलब्ध आहे.

एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचं, झालं तर तुम्हाला आणखी दमदार आणि मोठी सूट मिळू शकते. तुमच्या जुन्या फोनची स्थिती ठीक असल्यास तुम्ही तो फ्लिपकार्टवर परत करू शकता. त्याऐवजी, तुम्हाला २२ हजार रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते, ज्यामुळे फोनची किंमत अगदी २ हजारांपर्यंत झाली. परंतु यासाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती ठीक असली पाहिजे आणि ते जुन्या फोनच्या मॉडेलवर देखील अवलंबून आहे.

वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

Realme 10 pro 5g चे स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशनच्या बाबतीतही, तुम्हाला या फोनबद्दल कोणतीही तक्रार असणार नाही. कारण या फोनमध्ये ६.७ इंच फुल एचडी+ डिस्प्ले उपलब्ध आहे. याशिवाय यात ट्रिपल रेअर कॅमेरा देखील देण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 108MP देण्यात आला आहे. तुम्हाला फ्रंट कॅमेर्‍याबद्दल देखील कोणतीही तक्रार असणार नाही कारण हा फोन 16MP दमदार फ्रंट कॅमेऱ्यासह येतो. याशिवाय यामध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. म्हणजेच तुम्हाला बॅटरी बॅकअपबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही.

वाचा : आता मानवी मेंदूत चिप बसवता येणार, एलन मस्‍कच्या न्‍यूरालिंक कंपनीला USFDA ची मंजूरी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.