Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष ३० मे २०२३ : गंगादशहरा, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

10

राष्ट्रीय मिती ज्येष्ठ ९, शक संवत् १९४५, ज्येष्ठ शुक्ल दशमी, मंगळवार, विक्रम संवत् २०८०, सौर ज्येष्ठ मास प्रविष्टे १६, जिल्काद ९, हिजरी १४४५ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ३० मे सन् २०२३ सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु. राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत.दशमी तिथी दुपारी १ वाजून ९ मिनिटापर्यंत त्यानंतर एकादशी तिथी प्रारंभ। हस्त नक्षत्र सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत त्यानंतर चित्रा नक्षत्र प्रारंभ.

सिद्धी योग रात्री ८ वाजून ५४ मिनिटापर्यंत त्यानंतर व्यीतीपाल योग प्रारंभ. गर करण दुपारी १ वाजून ९ मिनिटापर्यंत त्यानंतर विष्टि करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कन्या राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-०२,
सूर्यास्त: सायं. ७-१०,
चंद्रोदय: दुपारी २-५०,
चंद्रास्त: उत्तररात्री ३-००,
पूर्ण भरती: सकाळी ८-४३ पाण्याची उंची ३.२१ मीटर, रात्री ८-२७ पाण्याची उंची ३.६१ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे २-१५ पाण्याची उंची १.७६ मीटर, दुपारी २-०९ पाण्याची उंची २.१२ मीटर.

दिनविशेष: गंगादशहरा समाप्ती, गंगावतार, गोवा राज्य दिन.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५१ मिनिटे ते १२ वाजून ४६ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३७ मिनिटे ते ३ वाजून ३२ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५८ मिनिटे ते १२ वाजून ३९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १२ मिनिटे ते ७ वाजून ३२ मिनिटापर्यंत. अमृत काळ रात्री ११ वाजून ३७ मिनिटे ते १ वाजून १९ मिनिटापर्यंत राहील. रवी योग पूर्ण दिवस राहील.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून १० मिनिटे ते ९ वाजून ५ मिनिटापर्यंत आणि त्यानंतर ११ वाजून १८ मिनिटे ते ११ वाजून ५८ मिनिटापर्यंत राहील.

आजचा उपाय : आज या महिन्यातला शेवटचा मंगळवार असून,सुंदरकांडचे वाचन करा आणि गरजूंना अन्नदान करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.