Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फक्त ८५० रुपयांना खरेदी करु शकता POCO C50, वाचा बंपर डिस्काउंट ऑफर

24

नवी दिल्ली : POCO ही स्मार्टफोन कंपनी बजेट स्मार्टफोनसाठी खास ओळखली जाते. तर आजही आम्ही तुम्हाला एका अशाच स्मार्टफोन सांगणार आहोत, जो कमी बजेट असणाऱ्यांसाठी बेस्ट पर्याय आहे. या फोनवर तुम्हाला बंपर डिस्काउंटही मिळत आहे. POCO C50 हा असाच एक फोन आहे ज्यामध्ये तुम्हाला अप्रतिम फीचर्स मिळणार आहेत. तसेच तो खरेदी करण्यापूर्वी तुम्ही काही ऑफर्सचा लाभ घेतलात तर तुम्हाला फोन अगदी स्वस्तात मिळेल. चला तर या फोनबद्दलची सर्व माहिती जाणून घेऊ…

POCO C50 (32GB+2GB RAM) Flipkart वरून मागवता येईल. या फोनची मूळ किंमत ८,९९९ रुपये आहे आणि तुम्ही हा फोन ३६% डिस्काउंटनंतर ५,६९९ रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत. बँक ऑफ बडोदा कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला १०% सूट मिळू शकते. अशीच ऑफर EMI Transaction वर देखील उपलब्ध आहे. म्हणजेच ही ऑफर तुमच्यासाठी खूप चांगली ठरू शकते. याशिवाय तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत वेगळी सूट मिळू शकते. तुमच्या जुन्या फोनची स्थिती ठीक असल्यास, तुम्ही तो फ्लिपकार्टवर रिटर्न करू शकता आणि आणखी ५,१५० रुपयांची सूट मिळवू शकता. पण एवढी सूट मिळण्यासाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि मॉडेलही भारी असायला हवं. या सर्वानंतर हा फोन अवघ्या ८५० रुपयांपर्यंत मिळेल.

POCO C50 चे स्पेसिफिकेशन्स
या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल विचार केला तर फोनमध्ये ६.५२ इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आ हे. या फोनमध्ये 8MP ड्युअल कॅमेरा उपलब्ध आहे, 5MP फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध असेल. फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी देखील उपलब्ध आहे, म्हणजेच तुम्हाला बॅटरी बॅकअपबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही. POCO C50 ला Mediatek Helio A22 प्रोसेसर, 2.0 GHz पर्यंत प्रोसेसर देण्यात आला आहे.

वाचा : 5G च्या युगात ही तुमचं इंटरनेट स्लो चालतंय? ‘या’ टीप्स कराव्या लागतील फॉलो

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.