Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

स्वस्तात iPhone घेण्याची संधी, ३२ हजारपेक्षाही कमी किंमत, Amazon वर सुरु आहे ऑफर

38

नवी दिल्ली : Cheapest iPhone on Amazon: जर तुम्ही Apple iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एका जबरदस्त ऑफरबद्दल माहिती देत आहोत. तुम्ही अगदी ३२ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत iPhone 12 खरेदी करू शकता. हा फोनहीी भारी फिचर्सने सुसज्ज असन या फोनमध्ये ड्युअल रेअर कॅमेऱ्यासह सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचं झालं तर या फोनवर फ्लॅट डिस्काउंटसोबत EMI ऑफर देखील दिली जात आहे. तसंच एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. जर तुम्हालाही या कमी किंमतीत iPhone 12 विकत घ्यायचा असेल तर ऑफरची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

Apple iPhone 12 ची किंमत आणि ऑफर
या फोनचा 64 GB स्टोरेज व्हेरिएंट ५९,९०० रुपयांऐवजी ऑफरमध्ये ५३,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. हा फोन तुम्ही २,५८० रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करू शकता. यासोबतच HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास २ हजार रुपयांची इन्स्टन्ट सूट दिली जाईल. याशिवाय तुमच्याजवळ जुना फोन पडून असेल तर तुम्ही तो एक्सचेंज करू शकता. यावर तुम्हाला तब्बल २२,५०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जाईल. अर्थात यासाठी जुन्या फोनचं मॉडेल आणि कंडीशन चांगली असायला हवी. दरम्यान या सर्व ऑफरनंतर तुम्ही हा फोन ३१,४९९ रुपयांना खरेदी करू शकता.

वाचा : Smartphone Care : चुकूनही या चुका करू नका, नाहीतर स्मार्टफोन कायमचा होईल खराब

Apple iPhone 12 चे स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. तसंच हा फोन A14 बायोनिक चिपने सुसज्ज आहे. यात 12MP अल्ट्रा वाइड आणि रुंद कॅमेरा असलेला ड्युअल रेअर कॅमेरा आहे. फोनमध्ये 12MP TrueDepth सेन्सर आहे. तसंच IP68 रेटिंग या फोनमध्ये देण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक, ब्लू, ग्रीन, व्हाईट अशा विविध रंगांमध्ये खरेदी करता येईल. तसेच, 64 GB स्टोरेज व्यतिरिक्त, हे 128 GB स्टोरेज आणि 256 GB स्टोरेज ऑप्शनमध्ये देखील हा फोन खरेदी केला जाऊ शकतो.

वाचा : Smart Pant : ऐकावं ते नवलंच! ‘या’ ॲपमुळे आता पँटची चैन बंद करायला विसरल्यावर मिळणार नोटिफिकेशन

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.