Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दहावीचा निकाल जाहीर झाला, अकरावीचे प्रवेश कसे पार पडणार, जाणून घ्या सविस्तर

16

मुंबई: अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. दहावीचा निकाल जाहीर झालेला आहे. त्यामुळे आता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कॉलेजचा पसंतीक्रमांक नोंदवता येणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी मार्गदर्शन केलं आहे.

यंदा अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाची तयारी

अकरावी प्रवेशासाठी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तीन नियमित गुणवत्ता याद्या आणि त्यानंतर दोन विशेष फेऱ्यांचे आयोजन केले जाणार आहे. सर्व पाच फेऱ्या झाल्यानंतरही ज्यांना गुणवत्ता व पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळाला नाही, त्यांच्यासाठी आवश्यकतेनुसार दैनिक गुणवत्ता फेऱ्यांचे आयेजन केलेले आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक आणि लिपिक यांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना इत्थंभूत माहिती देण्यात आलेली आहे, असं संदीप संगवे यांनी सांगितलं.

यंदा प्रवेशप्रक्रियेसाठी नवीन उपाययोजना

विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करण्यासाठी कॉल सेंटरची सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच शिक्षण विभागाने मुंबई महानगरात एकूण ४८ मार्गदर्शन केंद्रे स्थापन केली आहेत. मुंबई महानगराबाहेरील ज्या विद्यार्थ्यांना मुंबई महानगरातील कॉलेजांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्या विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे निश्चित केली आहेत. याची माहिती अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावर दिली आहे. मुंबई महानगरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमार्फतही मार्गदर्शन केले जाणार आहे. विभागीय स्तरावर दोन तांत्रिक सल्लागार उपसंचालक कार्यालयात उपलब्ध आहेत. ते तांत्रिक अडचणींबाबत ई-मेल, फोन आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. मोठी विद्यार्थी संख्या आणि भौगोलिक विस्तार लक्षात घेता आणखी सहा तांत्रिक साहाय्य प्रस्ताव संचालकांकडे पाठवले आहेत. यातून विद्यार्थ्यांना आणखी साहाय्य मिळेल, असं संदीप संगवे म्हणाले.

प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी काय करावं?

विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूवी अकरावीसाठी कोणती शाखा आणि विषय घ्यायचे हे निश्चित करावे. शाखा व विषयानुसार आणि संबंधित शाखेचे शुल्क काय हे पाहूनच कोणते कॉलेज सोईचे आहे हे विद्यार्थी आणि पालकांनी ठरविले पाहिजे, असं संदीप संगवे म्हणाले.

Pune News: गड आला पण सिंह गेला! माऊंट एव्हरेस्टची मोहीम फत्ते केल्यानंतर पुण्यातील पोलीस नाईक ब्रेन डेड

प्रवेश प्रक्रियेआधी विद्यार्थ्यांनी कोणकोणती कागदपत्रे जवळ बाळगावी?

संदीप संगवे यांनी विद्यार्थ्याला एखाद्या संवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याच्याकडे प्रवेशाचा अर्ज ऑनलाइन सादर करण्यापूर्वी स्वत:च्या जातीचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, असं सांगितलं. एससी व एसटी व्यतिरिक्त इतर संवर्गातील विद्यार्थी आरक्षणाचा लाभ घेत असतील, तर त्यांच्याकडे नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना विशेष (समांतर) आरक्षणाचा जसे की, बदलीने आलेल्या कर्मचाऱ्यांचे पाल्य, आजी-माजी सैनिकांचे पाल्य, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळात सहभागी किंवा पदक विजेते विद्यार्थी, राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी, प्रकल्पग्रस्त व भूंकपग्रस्त विद्यार्थी याचा लाभ घ्यावयाचा असेल, तर त्या विद्यार्थ्यांकडे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

उद्धव ठाकरेंचा हा निष्ठावंत कचाट्यात! मुख्यमंत्री शिंदे आणि राणेंचा राजकीय गेम प्लॅन उघड

विद्यार्थ्याला आवडत्या कॉलेजला अथवा शाखेला प्रवेश मिळू न शकल्यास त्याने काय करावे ?

मुंबई महानगरातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्णत: ऑनलाइन आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाखा, कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम व पसंतीक्रमाच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या जागा यानुसार संगणक प्रणालीद्वारे जागांचे वाटप होते. विद्यार्थ्यांनी विशिष्ट कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी आग्रह न धरता गुणवत्तेनुसार व पसंतीक्रमानुसार प्रणालीद्वारे मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावीच्या वर्गात प्रवेश घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असं संदीप संगवे म्हणाले.

SSC Result 2023: महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीचा निकाल ऑनलाइन पाहा, ‘ही’ घ्या थेट लिंक

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.