Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष ३ जून २०२३ : वटपौर्णिमा, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

13

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Jun 2023, 4:11 am

Daily Panchang In Marathi: शनिवार ३ जून २०२३, भारतीय सौर १३ ज्येष्ठ शके १९४५, ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशी सकाळी ११-१७ पर्यंत, चंद्रनक्षत्र: विशाखा सकाळी ६-१५ पर्यंत, अनुराधा उत्तररात्री ५-०३ पर्यंत, चंद्रराशी: वृश्चिक, सूर्यनक्षत्र: रोहिणी,

 

राष्ट्रीय मिती ज्येष्ठ १३, शक संवत १९४५, ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशी, शनिवार, विक्रम संवत २०८०, सौर ज्येष्ठ मास प्रविष्टे २०, जिल्काद १३, हिजरी १४४५ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ३ जून २०२३, सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु.राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. चतुर्दशी तिथी सकाळी ११ वाजून १७ मिनिटापर्यंत त्यानंतर पौर्णिमा तिथी प्रारंभ. विशाखा नक्षत्र सकाळी ६ वाजून १६ मिनिटापर्यंत त्यानंतर अनुराधा नक्षत्र प्रारंभ.

शिव योग दुपारी २ वाजून ४७ मिनिटापर्यंत त्यानंतर सिद्ध योग प्रारंभ. वणिज करण सकाळी ११ वाजून १७ मिनिटापर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र वृश्चिक राशीत संचार करेल.

सूर्योदय:

सकाळी ६-०२,

सूर्यास्त:

सायं. ७-१२,

चंद्रोदय:

सायं. ६-३५,

चंद्रास्त:

पहाटे ४-५८,

पूर्ण भरती:

सकाळी ११-३२ पाण्याची उंची ४.४६ मीटर, रात्री ११-२४ पाण्याची उंची ३.९१ मीटर,

पूर्ण ओहोटी:

पहाटे ४-४६ पाण्याची उंची ०.४८ मीटर, सायं. ५-३० पाण्याची उंची १.८४ मीटर.

दिनविशेष:

वटपौर्णिमा.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :

अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १० मिनिटे ते १ वाजून ३ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४९ मिनिटे ते ३ वाजून ४२ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून १५ मिनिटे ते १२ वाजून ५८ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १२ मिनिटे ते ७ वाजून ३४ मिनिटापर्यंत. अमृत काळ सायं ७ वाजून ११ मिनिटे ते ८ वाजून ४२ मिनिटापर्यंत. रवी योग सकाळी ६ वाजेपासून ते ६ वाजून १६ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :

राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ४६ मिनिटापर्यंत राहील. भद्रा काळ सकाळी ११ वाजून १६ मिनिटे ते रात्री १० वाजून १७ मिनिटापर्यंत राहील.

आजचा उपाय :

स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा करावी. शनी मंदिरात मोहरीचे तेल आणि काळे तिळ अर्पण करा. शनी चालीसाचा पाठ करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.