Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
oraimo FreePods 4 चे फीचर्स
यासोबत अॅक्टिव्ह नॉइज कँसिलेशन ANC मिळते. याशिवाय, याच्या बॅटरी वरून कंपनीने दावा केला आहे की, यात ३५ तासांपर्यंत बॅटरी बॅक अप मिळते. यात 5 EQ मोड्स दिले आहेत. यासोबत oraimo Sound अॅपचा सपोर्ट मिळतो. याच्या मदतीने तुम्ही साउंडला कस्टमाइज करू शकता. oraimo FreePods 4 सोबत ट्रान्सपॅरेन्सी मोड सुद्धा मिळते. अॅप सोबत फाइंड माय डिव्हाइसचा सपोर्ट मिळतो. कंपनीच्या दाव्यानुसार, या बड्स सोबत नॉइज फ्री ऑडियो मिळतो. गेमिंगसाठी लो लेंटेसी मोड सुद्धा मिळतो. दोन्ही बड्स सोबत कंट्रोल टच मिळतो. वॉटर रेसिस्टेंसाठी oraimo FreePods 4 सोबत IPX5 ची रेटिंग मिळते.
वाचाः Acer चा ३२ इंचाचा एचडी स्मार्ट टीव्ही मिळतोय फक्त ३ हजारात, ग्राहकांची गर्दी
oraimo FreePods 4 च्या ANC वरून 30dB च्या नॉइज कँसिलेशनचा दावा करण्यात आला आहे. यात चार मायक्रोफोन आहे. AI डीप न्यूरल नेटवर्कचा सपोर्ट सुद्धा दिला आहे. कॉल दरम्यान बाहेरचा गोंगाट ऐकू येणार नाही. oraimo FreePods 4 सोबत क्विक चार्जिंग सुद्धा मिळते. ज्यावरून दावा केला जात आहे की, १० मिनिटाच्या चार्जिंग नंतर १७० मिनिटाची बॅटरी लाइफ मिळते. बड्स सोबत बॅटरी लाइफ ३५.५ तासाची आहे. यात गुगल फास्ट पेयरिंगचा सपोर्ट आहे. याची किंमत १ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, याला आजपासून फ्लिपकार्टवरून १५९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता.
वाचाः Samsung Galaxy F54 5G ची ९९९ रुपयात बुकिंग, थेट २ हजाराची सूट