Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

LG चा १.५ टन स्प्लिट एसीवर दमदार ऑफर, अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची संधी, फ्लिपकार्टवर भन्नाट ऑफर

13

नवी दिल्ली : LG 1.5 Ton AC :एलजी कंपनीच्या १.५ टन इन्व्हर्टर स्प्लिट एसीवर भन्नाट ऑफर मिळत आहे. या एसींना उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असते. आता पावसाळा जवळ आला असला तरी एसीची मागणी अजूनही आहे, कारण गर्मी काही कमी झालेली नाही. चलातर एलजीच्या १.५ टन एसीवरील काही डिस्काउंट ऑफर्सची माहिती जाणून घेऊ…
तुम्ही Flipkart वरून LG Convertible 6-in-1 Cooling 2023 मॉडेल हा १.५ टनाचा ४ स्टार रेटिंग असणारा स्प्लिट ड्युअल इन्व्हर्टर एसी स्वस्तात खरेदी करू शकता. या एसीची मूळ किंमत ८१,९९० रुपये आहे. तुम्ही हा ५१% डिस्काउंटनंतर ३९,९९० रुपयांना ऑर्डर करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. यामध्ये SBI बँकेच्या मदतीने पेमेंटवर १०% पर्यंत इन्स्टन्ट सूट देखील मिळू शकते. तसं HDFC बँक क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यावर १०% सूट मिळू शकते. डेबिट कार्डवर EMI व्यवहारावर देखील १०% झटपट सूट मिळू शकते. याशिवाय तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा फायदा देखील मिळत आहे. तुम्ही फ्लिपकार्टला जुना एसी परत केल्यास, तुम्हाला त्याऐवजी ६,००० रुपयांची सूट मिळू शकते. मात्र यासाठी जुन्या एसीची स्थिती तशी चांगली असायला हवी.

वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच
काय आहेत स्पेसिफिकेशन्स?
या एसीच्या स्पेसिफिकेशनबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही. कारण एसी ४ स्टार असल्याने २०% पर्यंत विजेची बचत होते. कॉपर कंडेन्सरमुळे तुम्हाला खूप चांगले कूलिंग देखील मिळते. तसेच, हा दुरुस्त करणंही खूप सोपं होतं. यामध्ये स्लीप मोड देखील स्वतंत्रपणे उपलब्ध आहे.
वाचाः Xiaomi Pad 6 भारतात लाँच, ३० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.