Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष २१ जून २०२३: शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

11

राष्ट्रीय मिती ज्येष्ठ ३१, शक संवत १९४५, आषाढ, शुक्ल तृतीया, बुधवार, विक्रम संवत २०८०, सौर आषाढ मास प्रविष्टे ७, जिल्हिजा २, हिजरी १४४५ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख २१ जून सन २०२३. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, वर्षा ऋतु.राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. तृतीया तिथी दुपारी ३ वाजून १० मिनिटापर्यंत त्यानंतर चतुर्थी तिथी प्रारंभ. पुष्य नक्षत्र अर्धरात्रौ १ वाजून २१ मिनिटापर्यंत त्यानंतर आश्लेषा नक्षत्र प्रारंभ.

व्याघात योग अर्धरात्रौ २ वाजून ३४ मिनिटापर्यंत हर्षण योग प्रारंभ. गर करण दुपारी ३ वाजून १० मिनिटापर्यंत विष्टि करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कर्क राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-०३,
सूर्यास्त: सायं. ७-१७,
चंद्रोदय: सकाळी ८-३१,
चंद्रास्त: रात्री १०-०५,
पूर्ण भरती: दुपारी २-२१ पाण्याची उंची ४.२२ मीटर, उत्तररात्री १-५६ पाण्याची उंची ३.५७ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ७-०६ पाण्याची उंची ०.९२ मीटर, रात्री ८-२२ पाण्याची उंची १.९० मीटर.

दिनविशेष: कर्कायन रात्री ८-२८ दक्षिणायनारंभ, वर्षा ऋतू प्रारंभ, जागतिक योग दिन.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३६ मिनिटे ते ५ वाजून १९ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ५३ मिनिटे ते ३ वाजून ४६ मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून १९ मिनिटे ते १ वाजून २ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १७ मिनिटे ते ७ वाजून ३९ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी ६ वाजून १३ मिनिटे ते ८ वाजेपर्यंत. रवी योग सकाळी ६ वाजून २ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी १ वाजून २१ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंच गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून ११ मिनिटे ते १ वाजून ४ मिनिटापर्यंत राहील.

आजचा उपाय : दुर्गा सप्तशतीचा पाठ करा, मूगाची डाळ दान करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.