Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

OnePlus Nord CE 2 Lite च्या किंमतीत मोठी कपात, आता फक्त इतक्या रुपयात मिळणार

10

OnePlus Nord CE 2 Lite स्मार्टफोन खूपच स्वस्त झाला आहे. फोनला २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच करण्यात आले होते. फोनला या वर्षी एप्रिल मध्ये लाँच करण्यात आले होते. परंतु, आता या फोनच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. या फोनच्या किंमतीत २ हजार रुपयाची कपात करण्यात आल्याने फोन स्वस्तात मिळत आहे. या स्मार्टफोनला मार्केटमध्ये दोन स्टोरेज मध्ये आणले गेले आहे.

फोनची नवीन किंमत
OnePlus Nord CE 2 Lite स्मार्टफोनला दोन स्टोरेज मध्ये ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम व्हेरियंट मध्ये आणले आहे. याच्या ६ जीबी रॅम स्टोरेजच्या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये तर ८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, २ हजार रुपयाची कपात करण्यात आल्यानंतर ६ जीबी रॅम फोनची किंमत आता १७ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम स्टोरेजच्या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. फोनला दोन कलर म्हणजेच ऑप्शन ब्लॅक आणि ब्लू कलर मध्ये आणले गेले आहे.

वाचाः जपानचेही भारताच्या पावलावर पाऊल, गुगल आणि ॲपलचे वाढवले टेन्शन

फोनची फीचर्स
OnePlus Nord CE 2 Lite फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 120 हर्टज रिफ्रेश रेट सपोर्ट दिला आहे. तर प्रोसेसर म्हणून ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन ६९५ चिपसेट दिले आहे. फोनमध्ये १ टीबी मायक्रो एसडी कार्डचा सपोर्ट दिला आहे. फोन अँड्रॉयड १२ बेस्ड ऑक्सिजन ओएस १२.१ सपोर्ट सोबत येतो. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सोबत येतो. याचा मेन कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा आहे. या शिवाय, २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा दिला आहे. याशिवाय, सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये 33W फास्ट चार्जर सपोर्ट दिला आहे.

वाचाः iphone 15 series मध्ये दिसणार हे ३ मोठे बदल, पाहा डिटेल्स

वाचाः जपानचेही भारताच्या पावलावर पाऊल, गुगल आणि ॲपलचे वाढवले टेन्शन

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.