Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
HP 14s किंमत आणि ऑफर
तसं तर, याची किंमत ४७,२७९ रुपये आहे. यावर २३ टक्के डिस्काउंटसह हा ३५,९९० रुपयांना खरेदी करता येईल. यावर इतरही अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत, ज्यामध्ये एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. या लॅपटॉपवर तब्बल १७,९०० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यावर, लॅपटॉप १८,०९० रुपयांना खरेदी करता येईल. या लॅपटॉपवर बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत. त्यांच्याबद्दलही जाणून घेऊया.
या बँकेच्या आहेत खास ऑफर्स
HDFC बँकेच्या कार्डवरून पेमेंट केल्यास ४,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
ICICI बँक कार्डवरून पेमेंट केल्यास १०% सूट दिली जाईल.
तुम्ही IndusInd बँकेच्या कार्डने पैसे भरले तरी १०% सूट दिली जाईल.
PNB क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर १२ % झटपट सूट दिली जाईल.
तुम्ही लॅपटॉप EMI वर देखील खरेदी करू शकता. यासाठी दरमहा १,२३१ रुपये भरावे लागतील.
HP 14s चे फीचर्स
यात इंटेल कोर i3 11th Gen प्रोसेसर आहे. तसेच 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. हा Windows 11 Home वर काम करतो. हा अगदी स्लिम आणि हलका लॅपटॉप आहे. यात १४ इंच स्क्रीन आहे. यात FHD IPS मायक्रो-एज अँटी-ग्लेअर डिस्प्ले आहे. यासोबत एक वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे. हा दिसायला देखील एकदम स्टायलिश आहे.
वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स