Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Threads ने तोडले सारे रेकॉर्ड्स, वाढती क्रेझ पाहून ट्वीटरचं टेन्शन वाढलं

11

नवी दिल्ली : Threads App Downloads : मेटाच्या मालकीच्या इन्स्टाग्रामनेच थ्रेड्स हे नवे अ‍ॅप आता रिलीज केले असून ट्वीटरला स्पर्धा देण्यासाठी हे अ‍ॅप आले आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅपने काही तासांतच तुफान डाऊनलोड्स मिळवत सर्वकालीन उच्च डाउनलोड प्राप्त केले आहेत. अशा प्रकारे थ्रेड अ‍ॅप्सने एक नवा इतिहास रचला आहे. चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

तर थ्रेड्स अ‍ॅपच्या येण्याने मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्वीटरचे टेन्शन सर्वाधिक वाढले आहे. कारण थ्रेड्स अ‍ॅपला ट्वीटरच्या स्पर्धेतच उतरवण्यात आले आहे. ट्वीटर गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळे बदल करत आहे. एलन मस्कने ट्वीटर विकत घेतल्यावर रोज नवनवीन नियम लागू केले आहेत. यासोबतच ट्वीटरसाठी ब्लू सबस्क्रिप्शन लागू करण्यात आले आहे, ज्यासाठी यूजर्सना दरमहा ६५० ते ८०० रुपये मोजावे लागत होते. त्यामुळेच मेटाने थ्रेड्स अ‍ॅप लाँच केल्याने, ट्वीटरला पर्याय उपलब्ध झाला आहे. ज्यामुळे ट्वीटरला पर्याय शोधणाऱ्यांचा एक मोठा ट्वीटर वापरकर्तावर्ग थ्रेड्सकडे स्थलांतरित झाला आहे.

थ्रेड्स बनले सर्वाधिक डाऊनलोड होणारे अ‍ॅप
थ्रेड अ‍ॅप सर्वात वेगाने डाऊनलोड होणारे अ‍ॅप बनले आहे. थ्रेड अ‍ॅप आतापर्यंत ५० दशलक्षाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. हे अ‍ॅप लाँच झाल्यानंतर काही तासांतच एक कोटीहून अधिक वेळा डाऊनलोड झाले आहे.

१ कोची वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या अ‍ॅपला किती वेळ लागला?

थ्रेड अ‍ॅप – ७ तास
ट्विटर – २ वर्षे
फेसबुक – १० महिने
इंस्टाग्राम – २.५ महिने
WhatsApp – १ वर्ष
ChatGPT – ५ दिवस
Netflix – ३.५ वर्षे
Spotify – ५ महिने

कुठे डाउनलोड करायचे

थ्रेड अ‍ॅप iOS आणि Android प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. म्हणजेच ते अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते. याशिवाय, वापरकर्ते डेस्कटॉपवर साइटवरून थ्रेड वापरण्यास सक्षम असतील.

वाचा : ‘या’ तारखेला लाँच होणार Samsung चे आगामी फ्लिप फोन्स, दमदार फीचर्ससह बऱ्याच गोष्टी बदलणार

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.