Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Jio ची खास स्किम, आता तुमची बर्थ डेट किंवा लकी नंबर मोबाई नंबर म्हणून वापरा, फक्त फॉलो करा ‘या’ स्टेप्स

11

नवी दिल्ली : How to Get Jio Vip Mobile Number : सध्या देशभरात जिओचे अनेक वापरकर्ते आहेत. दिवसेंदिवस त्यांचे ग्राहक वाढत असून कंपनीही ग्राहकांना वेगवेगळ्या योजना देत आहे. अशामध्ये आता जिओने आणखी एक विशेष योजना सुरू केली आहे, जिथे वापरकर्ते त्यांच्या आवडीचा मोबाइल नंबर निवडू शकतील. तसे, अनेक कंपन्या व्हीआयपी मोबाईल नंबरची सिरीज काढतात. या नंबरमधून तुम्हाला एक नंबर निवडता येतो. पण जिओच्या नवीन स्कीममध्ये ग्राहक स्वत: त्याच्या पसंतीच्या मोबाईल नंबरपैकी शेवटचे ४ ते ६ नंबर निवडू शकणार आहेत. मग यात तुम्ही तुमचे लकी नंबर किंवा बर्थ डेट असं हवं ते निवडू शकता. तर जिओच्या या खास योजनेसाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.

किती रुपये द्यावे लागतील?

जिओच्या या नवीन प्लानसाठी तुम्हाला फक्त एकदाच ४९९ रुपये द्यावे लागतील. ही विशेष ऑफर Jio च्या प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ४९९ रुपयांशिवाय यूजर्सला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

नंबर कसा निवडायचा?

जिओच्या आवडत्या नंबरमध्ये तुम्ही जन्मतारीख, लकी नंबरसह तुमचा आवडता क्रमांक निवडू शकाल. यामध्ये पहिले चार किंवा ६ आकडे कंपनीकडून आधी निश्चित केले जातील, तर शेवटचा क्रमांक तुम्ही तुमच्या स्वतःनुसार निवडू शकाल. या प्रक्रियेला मोबाईल नंबर कस्टमायझेशन असेही म्हटले जाते.

फक्त ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

  • सर्वप्रथम तुम्हाला https://www.jio.com/selfcare/choice-number/ ला भेट द्यावी लागेल. यानंतर सेल्फ केअर विभागात जावे लागेल.
  • तसंच वापरकर्ते फोनवरील MyJio अॅपवरून थेट या चरणात प्रवेश करू शकतात.
  • यानंतर तुम्ही मोबाईल नंबर निवड विभागात पोहोचाल.
  • जिथे तुम्हाला तुमचा सध्याचा नंबर टाकावा लागेल. त्यानंतर OTP द्वारे नंबर व्हेरिफाय करावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला नवीन नंबर निवडण्याचा पर्याय दिला जाईल.
  • येथे तुम्ही तुमच्यानुसार शेवटचे ४ ते ६ मोबाईल नंबर निवडू शकाल.
  • हवा तो मोबाईल नंबर निवडल्यानंतर तुम्हाला पेमेंट पर्यायावर जावे लागेल.
  • येथे तुम्हाला ४९९ रुपये द्यावे लागतील.
  • तुमचा नवीन मोबाइल नंबर पेमेंट केल्यानंतर सुमारे २४ तासांनंतर सक्रिय होईल.

वाचा : Amazon Prime Day Sale मध्ये एकापेक्षा एक भन्नाट डिल्स, पाहा Smartphone वरील खास डिस्काउंट ऑफर्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.