Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एका दिवसात ४००० रुपये करता येतील अॅड
Google ने UPI Lite आणले आहे, जे वापरकर्त्यांना पिन न टाकता UPI पेमेंट करू देते. UPI Lite खात्यात दिवसातून दोनदा २००० रुपयांपर्यंतचे पैसे टाकले जाऊ शकतात. म्हणजे एका दिवसात जास्तीत जास्त ४००० रुपये जोडले जाऊ शकतात. तसेच, एकावेळी २०० रुपयांपर्यंतचे झटपट UPI पेमेंट करता येते.
१५ बँकांचा सपोर्ट
तुम्ही UPI Lite सह UPI पेमेंट कुठे केले आहे? या माहितीसाठी बँक पासबुकची सुविधा उपलब्ध आहे. Google Pay ची UPI Lite सेवा १५ बँकांच्या सेवांना सपोर्ट करते.
वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स
गुगल पे लाइट कसे सक्रिय कराल?
- सर्व प्रथम मोबाइलवर Google Pay अॅप उघडा.
- त्यानंतर प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा. यानंतर प्रोफाइल पेजवर खाली स्क्रोल करा. जिथे तुम्हाला UPI Lite एक्टिवेशन पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.
- यानंतर तुम्हाला काही तपशील टाकावे लागतील, त्यानंतर UPI लाइट सक्रिय होईल.
वाचा : जर प्राणी माणसांसारखे दिसले असते तर? AI नं तयार केलेले हे ‘विचित्र’ फोटो पाहिले का?