Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पात्रता :
चीफ डिजिटल ऑफिसर (CDO) :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३५ ते ते ५५ वर्षांमध्ये असावे.
चीफ रिस्क ऑफिसर (CRO) :
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४० ते ६० वर्षांमध्ये असावे.
(वाचा : Bank of Maharashtra Recruitment: स्केल II आणि स्केल III अधिकारी पदाच्या तब्बल ४०० जागांसाठी भरती)
अशी असणार निवड प्रक्रिया :
- सदर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखतींच्या माध्यमातून केली जाणार आहे.
- उमेदवाराचा अनुभव आणि शैक्षणीक पात्रतेनुसार बँकेच्यावतीने उमेदवारांची निवड करण्यात येणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीची पूर्व सूचना देण्यात येईल.
- उमेदवारांची अंतिम निवड ही मुलाखतीदरम्यान त्यांना मिळणाऱ्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे.
असा भरा अर्ज :
० बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने प्रसिद्ध पत्रकात जोडण्यात आलेल्या स्वरूपात या जागांसाठी अर्ज करणे बंधनकारक असणार आहे. (annexure a)
० अर्जासोबत बँकेच्या वतीने सांगण्यात आलेल्या सर्व कागद-पत्रांची छायांकित प्रत स्व-स्वाक्षरी (Self Attested Copies Of All Required Documents)जोडणे गरजेचे आहे.
० उमेदवारांना २५ जुलै २०२३ पर्यत हे अर्ज भरायचे असून, या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही.
० उमेदवारांकडून जमा केलेल्या अर्जात निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पातळीवर चूक अथवा खोटी माहिती आढळ्यास सादर अर्ज निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येतील. शिवाय, सादर उमेदवाराचा विचार या भरती प्रक्रियेसाठी केला जाणार नाही.
(वाचा : Dr. Tanu Jain Success Story: डेंटल सर्जन ते सरकारी अधिकारी, वाचा डॉ. तनु जैनचा प्रेरणादायी प्रवास)
अर्ज शुल्क :
- बँक ऑफ महाराष्ट्र मधील या दोन्ही पदाच्या निवड प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला अर्ज शुल्क भरणे अनिवार्य असणार आहे. १००० रुपये अर्ज शुल्क आणि १८० रुपये GST (१८% कर) अशी एकूण १ हजार १८० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे.
- हे अर्ज शुल्क कोणत्याही परिस्थिती परत मिळणार नाही (Non Refundable)
- हे अर्ज शुल्क डीडी (Demand Draft) स्वरूपात अर्जासोबत खालील पाट्यावर पाठवायचा आहे.
- उमेदवाराने १,१८० रुपयांचा DD “Bank of Maharashtra-Recruitment of CDO/CRO Project 2023-24” payable at Pune या नावाने काढलेला असावा.
अर्जासोबत जोडा ही कागदपत्र :
-उमेदवाराने अर्जावर दिलेल्या जागेमध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो व्यवस्थित चिकटवावा.
– खालील कागदपत्र छायांकित करून Self Attested करावी (दहावी, बारावी, पदवी आणि इतर गुणपत्रिका, जन्म तारखेचा आणि जन्माचा पुरावा, पॅनकार्ड, पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला (जन्म तारीख असलेला).
– आधी काम करत असलेल्या कंपनीचे रिलिविंग लेटर.
– इतर आवश्यक कागदपत्रही सोबत जोडणं अनिवार्य आहे.
या पत्त्यावर पाठवा अर्ज आणि अर्ज शुल्क :
GENERAL MANAGER
BANK OF MAHARASHTRA, H.R.M DEPARTMENT,
HEAD OFFICE, “LOKMANGAL”,1501, SHIVAJINAGAR, PUNE 411 005
(वाचा : ISRO Recruitment 2023: इस्रोमध्ये वैज्ञानिक व अभियंता पदासाठी भरती; तब्बल ६१ जागांसाठी अर्ज करण्याची संधी)