Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ अर्थात पत्रकारितेत करायचं असेल करिअर, करायला हवेत हे कोर्स

9

Career Opportunities in Journalism: आपल्या आजूबाजूला किंवा अगदी संपूर्ण जगात नक्की काय चाललंय याबाबत आपल्याला आजकाल इंटरनेटवर किंवा टीव्ही न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून बघत असतो. ही संपूर्ण माहिती रिपोटर्स आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. वर्तमानपत्र असो व टीव्ही चॅनेल्स या सर्वाकडे स्वतःचे रिपोर्टर्स असतात जे सर्व बातमी पोहोचवत असतात. अनेकदा एखादी मोठी आणि महत्त्वाची माहिती सर्वात आधी रिपोर्टसपर्यंतच पोहोचते. या रिपोर्टर्सना बघून आपल्यालाही रिपोर्टस होण्याची इच्छा होते. जर तुम्हाला पत्रकारिता क्षेत्रात येऊन रिपोर्टर्स होण्याची इच्छा असेल तर हे बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.

काळाच्या ओघात पत्रकारिता क्षेत्राचं स्वरूप आणि कामाची पद्धत बदलत चालली आहे. आज पत्रकारिता फक्त वर्तमानपत्रापुरता मर्यादित राहिलेली नसून मासिके, न्यूज चॅनल्स, पुस्तके, ब्लॉग, फोरम्स, ऑनलाइन या माध्यमातून फोफावली आहे. आज या क्षेत्राला मास मीडिया म्हणून ओळखलं जातं. इथे काम करणाऱ्या पत्रकारांची कार्यशैली आणि स्पेशलायझेशनचे विषयही बदलले. वही-पेन घेऊन फिरणारे पत्रकार आज माईक, कॅमेरा, रेकॉर्डर घेऊन फिरताना दिसतात. ऑडिओ-व्हिडीओची जोड देऊन ही बातमी अधिक प्रभावी बनवली जाते. ईमेल्स, फोन इन या प्रकारांची जोड देऊन हीच बातमी अधिक रंगतदार केली जाते. जेणे करून त्या बातमीचा प्रभाव अधिक लोकांवर पडेल. प्रभावी बनलेल्या या क्षेत्राची भुरळ पडल्यामुळे इथे करिअर करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे.

मीडिया आणि मास कम्युनिकेशन हे प्रचंड मोठं असं क्षेत्र आहे. यात समाविष्ट असणाऱ्या काही पर्यायांची ही ओळख:

प्रिंट जर्नालिझम:

पत्रकारितेतील सगळ्यात जुना असा हा प्रकार आहे. बातमी तयार करणं, ती संपादित करणं, तिचं योग्य प्रकारे डिझायनिंग करणं आदी कामं प्रिंट जर्नालिझममध्ये करावी लागतात. जगभरात, देशभरात एवढंच नाही तर स्थानिक परिसरातील छोट्यामोठ्या घटनांच्या बातम्या वर्तमानपत्रं, मासिकांमधून छापल्या जातात. वर्तमानपत्रं, मासिकांमधून आज स्पेशलाइज्ड् असे विभाग (जसे की, राजकीय, सिनेमा, मनोरंजन, शिक्षण, क्रीडा) तयार झाले आहेत. त्या त्या विभागानुसार बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. या सगळ्या विषयांची मांडणी करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे.

इलेक्ट्रॉनिक जर्नालिझम:

टीव्हीच्या माध्यमातून होणाऱ्या बातम्यांचा प्रभाव अधिक पडत असल्याने पत्रकारितेत येताना अधिक कला दिसून येतो, ते न्यूज चॅनलमध्ये करिअर करण्याचा. टीव्ही, रेडिओ, ऑडिओ, व्हिडीओ या माध्यमांचा आधार घेत बातमी प्रसारित केली जाते. या सगळ्याला आज ब्रॉडकास्टिंग जर्नालिझम म्हटलं जातं. चॅनल्सच्या वाढत्या संख्येमुळे सॅटेलाइट कम्युनिकेशन, केबल सर्व्हिस, रेडिओ स्टेशन्स आदी क्षेत्रांची व्यापकताही वाढत आहे. इलेक्ट्रॉनिक जर्नालिझममध्ये येताना योग्य ते प्रशिक्षण घेऊनच यावं लागतं. इथे पत्रकार तसंच प्रॉडक्शन, एडिटिंग, कॅमेरा, ग्राफिक्स, साऊंड, प्रोग्राम रीसर्च, स्क्रिप्ट रायटिंग आदी कामं करता येतात. तुमच्या आवडीप्रमाणे करिअर निवडा.

वेब पत्रकारितेत भरपूर वाव:

आता लोक ऑनलाइन बातम्या वाचण्यासाठी संगणकाशिवाय स्मार्ट मोबाईलचा वापर करू लागले आहेत. हेच कारण आहे की आज कोणत्याही आघाडीच्या वर्तमानपत्राची किंवा वृत्तवाहिनीची स्वतःची वेब आवृत्ती आहे. त्यामुळे वेब पत्रकारितेत भाविषयातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. वेब पत्रकारिता करताना तुम्हाला कॉपी एडिटर, सीनियर कॉपी एडिटर, चीफ कॉपी एडिटर आणि एडिटर म्हणून नोकऱ्या मिळू शकतात. याशिवाय अनेक स्वतंत्र न्यूज पोर्टल आहेत ज्यांचे स्वतःचे कोणतेही वर्तमानपत्र किंवा वृत्तवाहिनी नाही. अशा परिस्थितीत बातमी कव्हर करण्यासाठी रिपोर्टरसह कॉपी एडिटरसह इतर सर्व कर्मचाऱ्यांचीही गरज असते. शिवाय, वेब विश्वातील पत्रकारांव्यतिरिक्त, डिझाइनर आणि वेब डेव्हलपर्ससाठी देखील. नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत. वेबसाइटला एक दृश्य स्वरूप देते.

सोबतच, वेब डेव्हलपर डिझाइन केलेले पेज कोडींग करणे, लिंक देणे आणि पेज अपलोड करणे अशी अनेक काम या कामे या क्षेत्रात उपलब्ध आहेत. आता लोक ऑनलाइन बातम्या वाचण्यासाठी संगणकाशिवाय स्मार्ट मोबाईलचा वापर करू लागले आहेत.म्हणूनच, आज प्रत्येक आघाडीच्या वर्तमानपत्राची किंवा वृत्तवाहिनीची स्वतःची वेब आवृत्ती आहे. त्यामुळे वेब पत्रकारितेत भाविषयातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

वेब पत्रकारिता करताना तुम्हाला कॉपी एडिटर, सीनियर कॉपी एडिटर, चीफ कॉपी एडिटर आणि एडिटर म्हणून नोकऱ्या मिळू शकतात. याशिवाय अनेक स्वतंत्र न्यूज पोर्टल आहेत ज्यांचे स्वतःचे कोणतेही वर्तमानपत्र किंवा वृत्तवाहिनी नाही. अशा परिस्थितीत बातमी कव्हर करण्यासाठी रिपोर्टरसह कॉपी एडिटरसह इतर सर्व कर्मचाऱ्यांचीही गरज असते. शिवाय वेब विश्वातील पत्रकारांव्यतिरिक्त, डिझाइनर आणि वेब डेव्हलपर्ससाठी देखील. नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय, वेब डेव्हलपर, डिझाइन केलेले पेज कोडींग करणे, लिंक देणे आणि पेज अपलोड करणे हे काम करण्यासाठीही कौशल्यपूर्ण असणे आवश्यक असते.

या क्षेत्रातील प्रवेश घेण्यासाठी

या क्षेत्रात येण्यासाठी किमान डिग्री कोर्स करणं आवश्यक आहे. बारावीनंतर तुम्ही हा डिग्री कोर्स करू शकता. बऱ्याचशा कॉलेज, विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमधून अशा कोर्सला प्रवेश देण्यासाठी प्रवेश प्रक्रिया घेतली जाते. या क्षेत्रातील पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स करण्यासाठी कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पूर्ण असणं आवश्यक आहे.

एक वर्ष कालावधीच्या सर्टिफिकेट कोर्ससाठी बारावी पास असणं आवश्यक आहे.

करिअरच्या संधी

दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असणाऱ्या या क्षेत्रात करिअरसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. नव्याने आलेल्या न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून अनेक होतकरू आणि प्रशिक्षित पत्रकारांना करिअरच्या संधी मिळू लागल्या आहेत.

इथे करू शकता नोकरी :

  • वर्तमानपत्र
  • टीव्ही चॅनल्स, न्यूज चॅनल्स
  • प्रकाशन गृह
  • प्रेस इन्फर्मेशन ब्युरो
  • जाहिराती एजन्सीज
  • पब्लिक रिलेशन्स एजन्सीज
  • शासकीय संस्था, कायदेविषय काम करणारे विभाग

या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी असावे हे गुण…

– घटनांचं विश्लेषण करणं
– चांगलं संवादकौशल्य आणि लेखनकौशल्य
– लोकांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं व त्यांच्याबरोबर चांगला संपर्क निर्माण करणं
– योग्य निर्णय घेण्याची क्षमता
– संघटन कौशल्य

टेक्निकल ज्ञान आवश्यक

पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी पत्रकारितेच्या गुणांसोबतच तुम्हाला तांत्रिक ज्ञान असायला हवे. यासोबतच मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांचेही उत्तम ज्ञान असायला हवे. कारण या ऑनलाइन पत्रकारितेचा संपूर्ण पाया इंटरनेटवर आहे म्हणून इंटरनेट आणि कम्प्युटरचे ज्ञान असणेही महत्त्वाचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.