Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

३४ हजार ३५ विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण सोडले…? काय आहे प्रकरण जाणून घ्या

11

Dropouts Problem in Education Sector: यावर्षी देशातील विविध उच्च शिक्षण संस्थांमधून सुमारे ३४ हजार विद्यार्थ्यांनी आपले उच्च शिक्षण अर्धवट सोडल्याचे राज्यसभेत सांगण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बुधवारी राज्यसभेत ही माहिती जाहीर केली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसर, तब्बल ३४ हजार ०३५ विद्यार्थ्यांनी देशाभरतील विविध उच्च दर्जाच्या उच्च शिक्षण संस्थांमधून शिक्षण सोडले आहे. यात इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे (OBC) २५ % सह सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. या पाठोपाठ, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) मधील विद्यार्थ्यांचा क्रमांक लागतो.

या कारणांमुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी सोडले शिक्षण :

पदव्युत्तर आणि पीएचडी कार्यक्रमांमध्ये अर्धवट शिक्षण सोडणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांद्वारे कामाच्या मिळणाऱ्या विविध संधी आणि इतर चांगल्या संधींसाठी विद्यार्थी आपला अभ्यास सोडतात हे सर्वात मोठे कारण आहे. शिवाय, न जमणारा अभ्यास, विविध वैयक्तिक आणि अनेक वैद्यकीय कारणांमुळेही बहुतेक विद्यार्थ्यांनी त्यांचे पदवीचे शिक्षण सोडतात. राज्यमंत्री (MOS) सुभाष सरकार यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. शिवाय, यासंदर्भातील विविध कारणांवरही त्यांनी प्रकाश टाकला.

(वाचा : Education Loan : पहिली ते बारावीच्या शिक्षणासाठी कर्जाची सुविधा; या बँकेतून मिळते शिक्षणासाठी कर्ज)

हे थांबवण्यासाठी शासनही प्रयत्नशील

राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, आपले शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या विद्यार्थ्यंनाचे (गळतीचे) प्रमाण कमी करण्यासाठी संस्थांनी अनेक सकारात्मक सुधारणा केल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती, शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त वर्गांची तरतूद, विद्यार्थ्यांना तणावमुक्त करणारे समुपदेशन, मानसिक प्रेरणा इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.

आयआयटीमधूनही सोडले शिक्षण

  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) सारख्या प्रमुख तांत्रिक संस्थांमध्ये २०१९ ते २०२३ या कालावधीत एकूण ८ हजार १९३ विद्यार्थी आपले शिक्षण अपूर्ण ठेऊन बाहेर पडले.
  • तर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात करोनमुळे शाळा बंद होत्या या कारणामुळे यावर्षात शाळा सोडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती.
  • २०२१ मध्ये गळती झालेल्यांची संख्या २ हजार ४११ एवढी होती, तर २०२० मध्ये ती २ हजार १५२ एवढी झाली.
  • हा आकडा २०२२ मध्ये १ हजार ७४६ यावर्षी (जूनपर्यंत) ३२० होता.
  • तर, कोविडपूर्व वर्षात १ हजार ५१० विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडले होते.

गळती ही स्वातंत्र्यापासून मोठी समस्या आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीपासून भारतामध्ये गळती (Educational Dropout) ही मोठी समस्या आहे. तथापि, हे कमी करण्यासाठी, सरकारकडून वेळोवेळी विविध पावले उचलली गेली आहेत, तरीही गळती ही एक मोठी समस्या आहे.

(वाचा : IITB BSc Engineering: आयआयटी मुंबईच्या बीटेक कोर्सच्या तिसऱ्या वर्षी बाहेर पडल्यानंतर मिळणार बीएससीची पदवी)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.