Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Apple Airpods Pro 2nd Generation फक्त ६,५४० रुपयांना, आता सुरु आहे खास ऑफर

9

नवी दिल्ली : Apple AirPods Pro (2nd Generation) वर भन्नाट ऑफर सुरु आहे. Flipkart वर ही भारी ऑफर सुरु असून या ऑफरसह हे एअरपॉड्स अगदी ६,५४० रुपयांना उपलब्ध आहेत. अ‍ॅपलचा आगामी कार्यक्रम सप्टेंबरमध्ये होणार आहे. या इव्हेंटमध्ये Apple iPhone 15 मालिकेसोबत, नवीन Apple AirPods Pro USB-C पोर्टसह लाँच केले जातील. दरम्यान कंपनीचे नवीन प्रोडक्ट्स येत असून त्यामुळे सध्या मार्केटमध्ये असणारे प्रोडक्ट अगदी स्वस्तात मिळणार आहेत. चलातर सध्या मार्केटमध्ये असणाऱ्या Apple AirPods Pro वरील खास ऑफरबद्दल जाणून घेऊ…

तर लाँचच्या वेळी, AirPods Pro 2nd Generation ची किंमत २६,९०० रुपये होती. सध्या त्यांची किंमत २४,९९० रुपये आहे. पण ते फ्लिपकार्ट वरून खूप कमी किमतीत खरेदी करता येतील. फ्लिपकार्ट केवळ स्मार्टफोन खरेदीवरच नव्हे तर अनेक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर स्मार्टफोन एक्सचेंज ऑफर करते. त्यामुळेच हीच ऑफर Airpods Pro वर देखील उपलब्ध आहे. ज्यामुळे तुम्ही अगदी स्वस्तात हे एअरपॉड्स घरी घेऊन येऊ शकता. चलातर नेमकी ऑफर जाणून घेऊ…

Flipkart वर जवळपास २४ हजार रुपयांना या एअरपॉड्सना विकत घेताना iPhone 11 जर एक्सचेंजसाठी दिला तर त्यावर चांगली किंमत मिळत आहे. हे मॉडेल बऱ्यापैकी जुने आहे, तरी या ऑफरमध्ये १५,४५० रुपयांना आयफोन ११ कंपनी घेत आहे, त्यानंतर एअरपॉड्स फक्त ६,५४० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही जुना फोन एक्सचेंज करून अतिशय स्वस्तात हे एअरपॉड खरेदी करू शकता. Apple AirPods Apple च्या पोर्टफोलिओमधील सर्वात भारी AirPods पैकी एक आहेत. हे जगातील सर्वात लोकप्रिय इअरबड असल्याने तुम्हालाही हे असल्यास आताच खरेदी करु शकता…

वाचा : बजेट लॅपटॉप शोधताय? जिओनं आणलं JioBook फक्त १६,४९९ रुपयांना, जबरदस्त आहेत फीचर्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.