Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणजे काय…? का आहे या दिवसाला विशेष महत्त्व; जाणून घ्या इतिहास, कारणे आणि बरंच काही..
तरुणांना त्यांच्या दैनंदिन जीवनात रोजगार, काम आणि उद्योजकता यांसारख्या आवश्यक कौशल्यांसह समाज, देश आणि जगाच्या विकासात प्रगत भूमिका बजावता यावी म्हणून शाश्वत विकास उद्दिष्टांवरही भर देण्यात आला आहे. शिवाय, तरुणांना स्वत:चे महत्त्व समजावे आणि त्यांच्यासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा व्हावी यासाठीही या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
दरवर्षी हा विशेष दिवस वेगळ्या थीमवर आयोजित केला जातो, जिथे दरवर्षी एक वेगळा मुद्दा उपस्थित करून, तरुणाईचे महत्त्व आणि तरुणांची गरज आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जगासमोर मांडली जाते.
‘आंतराष्ट्रीय युवा दिना’ची यंदाची थीम इतर वर्षांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. पृथ्वी अनेक भौगोलिक समस्यांचा सामना करत आहे आपण विविध माध्यमांवर ऐकतो-वाचतो. या साऱ्याचा विचार करून ‘ग्रीन स्किल्स: एक शाश्वत जगाकडे…’ ही यावर्षीची थीम ठरवण्यात आली आहे. जगातील हरित बदलाच्या दिशेने आपली सतत पावले उचलली जात आहेत. त्यामुळे यावर्षीची थीम फक्त पर्यावरणाशी संबंधित सर्व समस्यांचे सकारात्मकतेने निर्मूलन करण्याची नाही, तर शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यावरही आधारित आहे.
(वाचा : Harshal Juikar Google Placement: IIT, IIM मधून नाही तर फक्त पुण्यातून BSC केलेल्या हर्षल जुईकरला Google मध्ये नोकरी)
का साजरा केला जातो ‘आंतराष्ट्रीय युवा दिन’…?
कोणत्याही देशासाठी तरुणांचा सहभाग सर्वात महत्त्वाचा असतो. विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही देशांतील तरुणांना मानसिक आणि सामाजिक अडचणी येण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच तरुणांनी जागरूक आणि विविध आव्हानांचा सामना करण्यास सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. दरवर्षी १२ ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून तरुणांमध्ये कायदेशीर समस्या आणि त्यांच्या सांस्कृतीविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.
जाणून घ्या ‘आंतरराष्ट्रीय युवा दिना’चा इतिहास :
१९९८ मध्ये जागतिक परिषदेत प्रथम ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ साजरा करण्याची सूचना करण्यात आली. परिषदेला उपस्थित असलेल्या मंत्र्यांनी तरुणांना समर्पित एक दिवस प्रस्तावित केला होता. पुढील वर्षी म्हणजेच १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सभेत ‘आंतरराष्ट्रीय युवा दिना’चा ठराव मंजूर करण्यात आला. ‘युनायटेड नेशन्स असेंब्ली’ने हा दिवस १७ डिसेंबर १९९९ रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला. परंतु तो १२ ऑगस्ट २००० पासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला. २०१३ मध्ये, YOUTHINK ने एक आंतरराष्ट्रीय युवा परिषद आयोजित केली होती ज्यामध्ये अनेक मोठे वक्ते आणि पुरस्कार समारंभाचा समावेश होता.
(वाचा : Success Story : आधी PCS नंतर IAS अधिकारी बनून करतेय काम; देशसेवेसाठी या अभिनेत्रीने सोडले मनोरंजनविश्व)
‘आंतराष्ट्रीय युवा दिन’ साजरा करण्याची ही आहेत प्रमुख कारणे :
जागतिक युवा दिन १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने सुरू केला. त्या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने १२ ऑगस्ट हा जागतिक युवा दिन म्हणून घोषित केला. परंतु हा दिवस पाळण्यामागे अनेक कारणे आहेत. सध्या जगभरात तरुणींची संख्या सुमारे १.२ अब्ज आहे. तंत्रज्ञान आणि विज्ञान जसजसे प्रगती करत आहे तसतसा काळ अधिक आधुनिक होत आहे. त्यासोबत आधुनिकताही बदलत आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे
० जगभरातील तरुणांना भेडसावणाऱ्या वाढत्या समस्यांवर प्रकाश टाकणे.
० आजची तरुणाई आर्थिक, सामाजिक आणि शारीरिक समस्यांनी ग्रस्त आहे. जसजसा काळ पुढे जातो तसतसे त्यांच्या समस्या अधिक ठळक होत जातात. त्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा होऊ लागला.
० तरुणांबरोबरच तरुणीही विविध क्षेत्रात यश मिळवत पुढे जात आहेत. मात्र, त्याचवेळी त्यांना विविध प्रकारे त्रास सहन करावा लागतो. आंतराष्ट्रीय युवा दिनानिमित्त त्या समस्यांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे.
० शिवाय, संयुक्त राष्ट्रांचे सचिव अँटोनियो गुटेरेस यांच्या म्हणण्यानुसार “मानवी सभ्यतेच्या विकासासाठी नवीन कल्पना, ऊर्जा आणि उत्साह आवश्यक आहे. तरुणांमध्ये हे घटक प्रामुख्याने असतात. त्यामुळे तरुणांच्या समस्यांचा अधिक सखोल विचार व्हायला हवा.” हेही या दिवसामाचे मुख्य कारण आहे.
(वाचा : Tilak Mehta Startup Success: मूर्ती लहान पण ‘तिलक मेहता’ची किर्ती महान, करिअरमध्ये मिळवलेय तुफान यश)