Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांच्या २०० हून अधिक जागांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी फक्त १ महिन्यांचा अवधी
एचपीसीएलमधील या सर्व पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडूना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि निवड प्रक्रिया या बाबतची माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.
(वाचा : NTPC Recruitment: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये इंजिनियर्सना कामाची संधी; २ लाखांहून अधिक पगार देणाऱ्या ‘या’ पदांसाठी भरती)
पदभरतीचा तपशील :
- मॅकेनिकल इंजिनीअर (Mechanical Engineer) : ५७ जागा
- इलेक्ट्रिकल इंजिनीअर (Electrical Engineer) : १६ जागा
- इंस्ट्रुमेन्टेन्शन इंजिनीअर (Instrumentation Engineer) : ३६ जागा
- सिव्हिल इंजिनीअर (Civil Engineer) : १८ जागा
- केमिकल इंजिनीअर (Chemical Engineer) : ४३ जागा
- सिनिअर ऑफिसर सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD) ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स (Sr. Officer City Gas Distribution, Operations and Maintenance : १० जागा
- सिनिअर ऑफिसर – एलएनजी बिझनेस (LNG Business) (Sr. Officer – LNG Business) : २ जागा
- सिनिअर ऑफिसर/ असिस्टंट मॅनेजर -बायोफ्युएल प्लांट ऑपरेशन्स (Sr. Officer / Assistant Manager-Biofuel Plant Operations) : १ जागा
- सिनिअर ऑफिसर/ असिस्टंट – सीबीजी प्लांट ऑपरेशन्स (Sr. Manager / Assistant Manager – CBG Plant Operation) : १ जागा
- सिनिअर ऑफिसर सेल्स (रिटेल/लुब्स/डायरेक्ट सेल्स/एलपीजी) Sr. Officer Sales : ३० जागा
- सिनिअर ऑफिसर/ असिस्टंट – नॉन फ्युएल बिझनेस (Sr. Officer / Assistant -Non Fuel Business) : ४ जागा
- सिनिअर ऑफिसर/ असिस्टंट – इव्ही चार्जिंग स्टेशन बिझनेस (Sr. Officer / Assistant -EV Charging Business) : २ जागा
- फायर अँड सेफ्टी ऑफिसर – मुंबई रिफायनरी (Fire and Safety Officer) : २ जागा
- फायर अँड सेफ्टी ऑफिसर – विसख रिफायनरी (Fire and Safety Officer) : ६ जागा
- क्वालिटी कंट्रोल ऑफिसर (QC Officer) : ९ जागा
- चार्टर्ड अकाउंटंट (Chartered Accountant): १६ जागा
- कायदा अधिकारी (Law Officer) : ५ जागा
- कायदा अधिकारी (एचआर) (Low officer HR) : २ जागा
- वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ४ जागा
- जनरल मॅनेजर (कंपनी सेक्रेटरी) (General Officer CS) : १ जागा
- वेल्फेअर ऑफिसर (Welfare Officer) – मुंबई रिफायनरी : १ जागा
(वाचा : ASRB Recruitment: प्रिन्सिपल सायन्टिस्ट, सीनिअर सायन्टिस्ट पदासाठी भरती; अॅग्रीकल्चर सायंटिस्ट्स रिक्रूटमेंटची भरतीची घोषणा)
शैक्षणिक पात्रता :
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या असून त्याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी मूळ जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
नोकरी ठिकाण : मुंबई
महत्त्वाच्या तारखा :
अर्ज करण्यास सुरुवात : १८ ऑगस्ट २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ सप्टेंबर २०२३
महत्त्वाचे :
० एचपीसीएलमधील सदर जागांसही अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे.
० १८ ऑगस्ट २०२३ ला सकाळी ९ वाजल्यापासून १८ सप्टेंबर २०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
० अर्ज करण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. करिअर (Career) टॅबमध्ये जाऊन Current Openings वर क्लिक करा.
० ऑनलाइन अर्जाव्यतिरिक्त आलेले इतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
० अर्धवट किंवा चुकीची माहिती आढळलेले कोणतेही अर्ज निवड प्रक्रियेच्या कोणत्ययी टप्प्यावर रद्द केले जातील.
० या जगण्यासाठी अर्ज करताना उमेदवारांना सध्य स्थितीत चालू असणारा ईमेल आयडी आणि मोबाईल नामावर वापराने अनिवार्य आहे.
० एकद अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवाराना त्यात कोणतेही बदल करता येणार नसल्यामुळे उमेदवाराने सदर अर्ज काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.
० निवड झाल्यानंतर सादर उमेदवारांना पुढील प्रक्रियेविषयी माहिती ईमेलच्या माध्य्माटाऊन कळवली जाईल.
(वाचा : DRDO ADA Recruitment 2023: डीआरडीओमध्ये ‘प्रोजेक्ट इंजिनिअर’च्या ५३ पदांवर होणार भरती, या तारखेपर्यत करता येणार अर्ज)
अर्ज शुल्काविषयी :
उपरोक्त सर्व जागांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे भरणे आवश्यक आहे. तर, काही उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी मूळ जाहीरात वाचा
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमधील उपरोक्त पद भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड पद भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.