Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे पंचांग आणि दिनविशेष २१ ऑगस्ट २०२३: पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. पंचमी तिथी अर्धरात्रौ २ वाजून १ मिनिटापर्यंत त्यानंतर षष्ठी तिथी प्रारंभ. चित्रा नक्षत्र सकाळी सूर्योदय ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ३२ मिनिटापर्यंत त्यानंतर स्वाती नक्षत्र प्रारंभ. शुभ योग रात्री १० वाजून २० मिनिटापर्यंत त्यानंतर शुक्ल योग प्रारंभ. बव करण दुपारी १ वाजून १२ मिनिटापर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र सायं ५ वाजून ३० मिनिटापर्यंत कन्या राशीत राहील त्यानंतर तूळ राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-२२ ,
सूर्यास्त: सायं. ७-०१,
चंद्रोदय: सकाळी १०-०९,
चंद्रास्त: रात्री १०-०३,
पूर्ण भरती: पहाटे २-२५ पाण्याची उंची ३.८७ मीटर, दुपारी २-४१ पाण्याची उंची: ४.०१ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ७-५२ पाण्याची उंची १.४४ मीटर, रात्री ८-३८ पाण्याची उंची १.०७ मीटर.
दिनविशेष: नागपंचमी, खोरदादसाल.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २६ मिनिटे ते ५ वाजून ९ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३४ मिनिटे ते ३ वाजून २७ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून २ मिनिटे ते १२ वाजून ४६ मिनिटापर्यंत राहील. गोधूली बेला सकाळी ६ वाजून ५५ मिनिटे ते ७ वाजून १७ मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ सकाळी ९ वाजून ९ मिनिटे ते १० वाजून ४६ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटापर्यंत ते ९ वाजेपर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलीक काळ राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १२ वाजून ५० मिनिटे ते १ वाजून ४२ मिनिटापर्यंत. यानंतर दुपारी ३ वाजून २७ मिनिटे ते ४ वाजून १९ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : आज पितळाच्या लोट्याने शिवलिंगावर पाणी अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)