Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष २६ ऑगस्ट २०२३: शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

9

राष्ट्रीय मिती भाद्रपद ४, शक संवत १९४५ द्वितीय (शुद्ध) श्रावण शुक्ल दशमी, शनिवार, विक्रम संवत २०८०, सौर भाद्रपद मास प्रविष्टे १०, सफर ८, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २६ ऑगस्ट २०२३, सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋतु.

राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. दशमी तिथी अर्धरात्रौ १२ वाजून ९ मिनिटापर्यंत त्यानंतर एकादशी तिथी प्रारंभ. ज्येष्ठ नक्षत्र सकाळी ८ वाजून ३८ मिनिटापर्यंत त्यानंतर मूल नक्षत्र प्रारंभ. विष्कुंभ योग सायं ४ वाजून २६ मिनिटापर्यंत त्यानंतर प्रीति योग प्रारंभ.

तैतिल करण दुपारी १ वाजून ६ मिनिटापर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र सकाळी ८ वाजून३८ मिनिटापर्यंत वृश्चिक राशीत त्यानंतर धनु राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-२४,
सूर्यास्त: सायं. ६-५७,
चंद्रोदय: दुपारी २-५४,
चंद्रास्त: उत्तररात्री १-५६,
पूर्ण भरती: सकाळी ७-३५ पाण्याची उंची ३.३४ मीटर, सायं. ६-३२ पाण्याची उंची २.९८ मीटर,
पूर्ण ओहोटी: दुपारी १-२९ पाण्याची उंची २.५७ मीटर, उत्तररात्री १-३५ पाण्याची उंची १.२७ मीटर.

दिनविशेष: कलश दशमी.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २७ मिनिटे ते ५ वाजून ११ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३२ मिनिटे ते ३ वाजून २३ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून १ मिनिटे ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत राहील. गोधूली बेला सकाळी ६ वाजून ५० मिनिटे ते ७ वाजून १२ मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ सकाळी ७ वाजून ३३ मिनिटे ते ९ वाजून १० मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ५ वाजून ५६ मिनिटे ते ६ वाजून ४७ मिनिटापर्यंत. यानंतर सकाळी ६ वाजून ४७ मिनिटे ते ७ वाजून ३९ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : आज शनि मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तसेच सूर्याला काळे तिळ टाकून जल अर्पण करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.