Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
लाखो नव्हे, करोडोमध्ये कमवयाचे आहे; कम्प्युटर सायन्समध्ये बी-टेक करून करियरचे हे दहा पर्याय बदलतील तुमचे नशीब
कम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केल्यानंतर विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकतात. यासाठी ते एम.टेक आणि पीएचडीच विचार करू शकतात. याशिवाय, GATE परीक्षा उत्तीर्ण होऊन उमेदवार PSU (Public Sector Undertakings) अंतर्गत BHEL (Bharat Heavy Electricals Limited) किवा GAIL मध्ये चांगले करिअर करू शकतात. या कंपन्यांमध्ये गेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना कोणतीही परीक्षा न घेता थेट निवड करून नोकरीची मिळते.
एमबीए (MBA) किंवा पीजीडीएम (PGDM) चा पर्याय:
कम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केल्यानंतर विद्यार्थी Master of Business Administration (MBA) आणि Post Graduate Diploma in Management (PGDM) अभ्यास करू शकतात. यासाठी ते CAT (Common Admission Test) म्हणजेच सामाईक प्रवेश परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेतील गुणांच्या आधारे तुम्हाला आयआयएममध्ये एमबीए आणि पीजीडीएम अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. एमबीए शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चांगली प्लेसमेंट मिळते.
(वाचा : नोकरी मिळवण्यासाठी शिक्षणसोबत एक्स्ट्रा टॅलेंटेड असणे आवश्यक; करा हे Certificate कोर्सेस)
टेक्निकल क्षेत्रात नोकरी :
कम्प्युटर सायन्समध्ये B.Tech केल्यानंतर विद्यार्थ्यांना टेक्निकल क्षेत्राशी संबंधित नोकरी करता येऊ शकते. यासाठी तुम्ही डेटा सायन्स अँड अॅनालिसिस, मशिन लर्निंग इंजिनीअर, आर्टिफिशियल इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, कम्प्युटर नेटवर्क आर्किटेक्ट अशा विविध क्षेत्रात करिअर करू शकतात.
सरकारी नोकरीची तयारी :
कम्प्युटर सायन्समध्ये B.Tech केल्यानंतर, विद्यार्थी GATE परीक्षा देऊन इंजिनिअरिंग पदवीधर होऊन UPSC, SSC, विविध बँकिंग परीक्षा, IAS सारख्या विविध सरकारी परीक्षांसाठी अर्ज करू शकतात. या परीक्षांमध्ये उमेदवाराची निवड झालास त्यांना चांगला पगार तसेच इतर अनेक सोयीसुविधाही मिळतात.
स्वत: चा व्यवसाय (Business) :
जर विद्यार्थ्यांमध्ये समाजात बदल घडवण्याची इच्छा आणि जिद्द असेल तर, असा विद्यार्थ्यांसाठी स्वतःचा स्टार्टअप सुरू करमे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. स्वतःच्या बिझनेस स्टार्टअपच्या माध्यमातून हे तरुण इतरांना नोकऱ्या देऊ शकतील. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या Startup साथी विद्यार्थ्यांना बँकांकडून सहज मिळू शकते.
(वाचा : Fashion Designer बनायचे आहे; कोणता विषय निवडू? या क्षेत्रात काम करण्याला Scope किती..?)
नॅनो-टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर (Masters in Nano-Technology) :
B.Tech in CSE (Computer Science Engineering) नंतर, विद्यार्थी नॅनोटेक टेक्नॉलॉजीमध्ये M.Tech चा अभ्यास करू शकतात. हा कोर्स केल्यानंतर इतर अनेक पर्यायही विद्यार्थ्यांसाठी खुले होतील. नॅनोटेकचे विद्यार्थी विशेषत: इलेक्ट्रॉनिक उद्योग आणि एरोस्पेसमध्ये काम करतात.
सायबर सिक्युरिटी आणि सायबर लॉ मध्ये मास्टर (Cyber Security and Law masters) :
इंटरनेटचा वापर वाढल्याने सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे सायबर सिक्युरिटीमध्ये पदवीधरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे, बीटेक सीएसई नंतर हा एक चांगला पर्याय देखील ठरू शकतो. हा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोट्यवधींचे पॅकेज सहज मिळते.
कम्प्युटर सायन्समध्ये एम.टेक (M Tech in Computer Science) :
B.Tech CSE नंतर, विद्यार्थी कम्प्युटर सायन्समध्ये M.Tech देखील करू शकतात. बी.टेक.च्या विद्यार्थ्यांना बीसीएच्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक अनुभव असतो. एमटेक कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना अँड्रॉइड प्रोग्रामिंग (Android Programming), डेटा सायन्स (Data science) आणि वेब अॅनालिटिक्स (Web Analytics) सारख्या क्षेत्रांचे अधिक ज्ञान असते. या विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांचे पॅकेजही मिळते.
IT मध्ये M.Tech :
ही पदवी जवळजवळ संगणकशास्त्रातील एम.टेक सारखी आहे. पण अभ्यासक्रम थोडा वेगळा आहे. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोन्ही पैलूंबद्दल शिकू शकाल. त्या तुलनेत आयटीच्या सॉफ्टवेअर भागावर अधिक भर असेल.
पीजी डिप्लोमा इन डाटा साइंस (PG Diploma in Data Science) :
सीएसमधून बीटेक केल्यानंतर विद्यार्थी पीजी डिप्लोमा इन डेटा सायन्स कोर्सही करू शकतात. हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतात. शिवाय, इतरही अनेक पर्याय खुले होतात.
(वाचा : सरकारी आणि खासगी नोकरी मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील हे TOP 11 Educational Apps)