Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
…म्हणून आता WhatsApp वर येऊ शकतात Telegram आणि Signal अॅप्सचे मेसेज, प्रत्येक मेसेंजर इंस्टॉल करण्याची गरज नाही
क्रॉस प्लॅटफॉर्म मेसेजिंग म्हणजे काय?
नवीन फीचरमुळे एखादा टेलीग्राम युजर व्हॉट्सअॅप अकाऊंट न बनवता कोणत्याही व्हॉट्सअॅप युजरला मेसेज पाठवू शकेल. त्याचप्रमाणे सिग्नल अॅप युजर्स आणि अन्य लोकप्रिय मेसेजिंग अॅप्सचे युजर्स देखील व्हॉट्सअॅपवर मेसेज करू शकतील. अशाप्रकारे व्हॉट्सअॅप युजर्सना हे अॅप्स डाउनलोड न करता देखील त्यांच्या युजर्ससोबत चॅटिंग करता येईल, ह्यालाच क्रॉस प्लॅटफॉर्म मेसेजिंग म्हणतात.
वाचा: iPhone 15 सीरिजमध्ये होऊ शकतात मोठे बदल; मोठी स्क्रीन, टायटेनियम फ्रेम आणि बरंच काही…
वेगळ्या सेक्शनमध्ये दिसतील अॅप्सचे मेसेज
रिपोर्टनुसार, नवीन फीचरची डेव्हलपमेंट सध्या सुरु आहे. ती पूर्ण होतच युजर्स हे फीचर वापरू शकतील. WABetaInfo नं शेयर केलेल्या स्क्रीनशॉट्सवरून समजलं आहे की थर्ड-पार्टी अॅप्सवरून व्हॉट्सअॅपवर पाठवलेले मेसेजेस एका वेगळ्या सेक्शनमध्ये दिसतील.
वाचा: स्वदेशी कंपनीची कमाल! १६जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेजसह Lava Blaze 2 Pro लाँच
व्हॉट्सअॅप नवीन रेग्युलेशन संबंधित बदल करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी घेणार आहे. त्यामुळे हे नवीन फीचर फक्त युरोपियन युनियन पुरतं मर्यादित राहू शकतं आणि EU च्या बाहेरच्या देशांमध्ये युजर्सना नवीन फीचर मिळू शकणार नाही. त्यामुळे अधिकृत माहितीची वाट पाहावी लागेल.