Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘कृषी वैज्ञानिक भरती मंडळ’ मध्ये ३६८ पदांची भरती! जाणून घ्या नोकरीचे सविस्तर तपशील..

8

कृशी संशोधन क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या ‘एएसआरबी’ (Agricultural Scientists Recruitment Board) ‘कृषी वैज्ञानिक भरती मंडळ’ यांनी नुकतीच या महाभरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत प्रधान शास्त्रज्ञ, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पदांच्या एकूण ३६८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून आरज मागवण्यात आले आहेत. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून १५ सप्टेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

‘कृषी वैज्ञानिक भरती मंडळ’ भरती प्रक्रिया २०२३ बद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमणे…

पदाचे नाव आणि पदसंख्या:
प्रधान शास्त्रज्ञ – ८० जागा
ज्येष्ठ शास्त्रज्ञ – २८८ जागा
एकूण रिक्त जागा – ३६८

शैक्षणिक पात्रता

प्रमुख शास्त्रज्ञ (principal scientist)
संबंधित मूलभूत विज्ञानासह कृषी रसायनातील डॉक्टरेट पदवी असणे आवश्यक. तसेच संबंधित विषयातील १० वर्षे कामाचा अनुभव ज्यापैकी ८ वर्षे वैज्ञानिक विशेषज्ञ म्हणून समकक्ष पदावर असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी प्रकाशित कार्य/नवीन योजना आणि प्रभावाचा पुरावा म्हणून संशोधन/अध्यापन विस्तार शिक्षणामध्ये योगदान दिलेले असावे.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ (senior scientist)
वैज्ञानिक विशेषज्ञ म्हणून संबंधित विषयातील ८ वर्षांच्या अनुभवासह संबंधित मूलभूत विज्ञानासह मायकोलॉजी आणि वनस्पती पॅथॉलॉजीमधील डॉक्टर आणि पदवी असणे आवश्यक आहे.
(याशिवाय इतर शैक्णिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून ती जाणून घेण्यासाठी अधिसूचना वाचावी. त्याची लिंक खाली दिलेली आहे.)

(वाचा: SSB Recruitment 2023: ‘सशस्त्र सीमा बल’मध्ये इंजिनीअर्स साठी भरती! जाणून घ्या कसा करायचा अर्ज..)

वयोमर्यादा:

प्रधान शास्त्रज्ञ – ५२ वर्षे
ज्येष्ठ शास्त्रज्ञ – ४७ वर्षे
(दोन्ही पदांमध्ये कमाल वयोमार्यादेत ओबीसी प्रवर्गाला ३ वर्षांची टीआर राखीव प्रवर्गाला ५ वर्षांची सूट आहे.)

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ सप्टेंबर २०२३

कृषी वैज्ञानिक भरती मंडळाची अधिकृत वेबसाईट: www.asrb.org.in

वेतनश्रेणी:

प्रधान शास्त्रज्ञ : १ लाख ४४ हजार २०० ते २ लाख १८ हजार २००
ज्येष्ठ शास्त्रज्ञ : १ लाख ३१ हजार ४०० ते २ लाख १७ हजार १००

अर्ज शुल्क:

१५०० रुपये. (महिला, पीडब्ल्यूडी, एससी,एसटी यांना शुल्क माफ आहे )

या भरती संदर्भात सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/12K06T1-OqYMgSgsc6KfhHyWT0rRLA2wu/view या लिंक व्हीआर क्लिक करावे.

(वाचा: MRVC Recruitment 2023: ‘मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन’ मध्ये भरती! जाणून घेऊया भरतीचे सर्व तपशील..)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.