Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सावधान! पाकिस्तानी हॅकर्सच्या निशाण्यावर भारतीय Android युजर्स, अशाप्रकारे करा बचाव

10

पाकिस्तान हॅकर्स आता भारतीय युजर्सच्या फोनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्यासाठी पाकिस्तान सपोर्टेड हॅकर्स ग्रुप Transparent Tribe नं धोकादायक CapraRAT व्हायरसची मदत घेतली आहे. सायबर सिक्योरिटी रिसर्च एजेंसी SentinelOne च्या अलीकडेच आलेल्या रिपोर्टनुसार, CapraRAT एक खतरनाक व्हायरस आहे, जो मोबाइल रिमोट अ‍ॅक्सेस ट्रोजन (RAT) व्हायरस आहे, ज्यामुळे पाकिस्तानच्या सीमेलगत राहणाऱ्या लोकांच्या माध्यमातून नजर ठेवली जाऊ शकते. पाकिस्तानी हॅकर्स ह्या व्हायरसच्या माध्यमातून खासकरून कश्मीरमधील Android स्मार्टफोन युजर्सना टारगेट करत आहेत.

अलीकडेच Trend Micro च्या रिसर्च टीमनं सांगितलं आहे की CapraRAT प्रामुख्याने अँड्रॉइड सोर्स कोडवर आधारित असतो. त्यामुळे iOS म्हणजे iPhone युजर्सना ह्याचा धोका नाही. भारतात Android युजर्सची संख्यां iOS च्या तुलनेत खूप जास्त आहे. पाकिस्तान सपोर्टेड ह्या हॅकर ग्रुपनं भारत आणि पाकिस्तानच्या मिलिट्री आणि डिप्लोमॅटिक अधिकाऱ्यांना ह्याआधी देखील टारगेट केलं आहे.

हे देखील वाचा: रेडमीचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन येतोय उद्या; परवडणाऱ्या किंमतीत Redmi Note 13 Series लाँचसाठी सज्ज

Android युजर्सना धोका

सायबर सिक्योरिटी रिसर्च टीमचे रिसर्चर अ‍ॅलेक्स डेलमोटनुसार, CapraRAT एक शक्तीशाली टूल आहे, ज्याच्या माध्यमातून Android युजर्सच्या फोनचा डेटा कंट्रोल केला जाऊ शकतो. हे टूल इतर अ‍ॅपमध्ये कोडिंगच्या माध्यमातून RAT लपवू शकतो, त्यामुळे जास्त धोकादायक आहे. त्यामुळे युजर्सना हा व्हायरस लपल्याची खबर देखील लागत नाही. रिपोर्टनुसार, पाकिस्तानी हॅकर्स ग्रुप Transparent Tribe नं हा व्हायरस Google Play Store च्या माध्यमातून युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये इंजेक्ट करण्यास सुरुवात केली आहे.

इतकंच नव्हे तर हॅकर्सनं गुगल प्ले स्टोर व्यतिरिक्त सोशल प्लॅटफॉर्म्स, सोशल चॅनेल्स, सेल्फ रन वेबसाइट इत्यादींच्या माध्यमातून देखील ह्याचा प्रसार सुरु केला आहे. युजर्सना हॅकर्स अ‍ॅप्सच्या एपिके फाईल्सची लिंक देखील पाठवत आहेत, त्यामुळे व्हायरस इंफेक्टेड हे अ‍ॅप्स युजरच्या फोनमध्ये इंस्टॉल होतात. ह्यासाठी हॅकर्स लोकप्रिय फिशिंग टेक्नॉलॉजीचा वापर करत आहेत, ज्यात युजर्सना आकर्षित करण्यासाठी ऑफर्सच्या माध्यमातून फसवलं जातं.

रिसर्च ग्रुपनुसार, पुढील सोर्स कोड्स युजर्सच्या डिवाइसमध्ये मिळतात.

  • com.Base.media.service
  • com.moves.media.tubes
  • com.videos.watchs.share

हॅकर्स अशाप्रकारे करत आहेत Android युजर्सची अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक

  • युजर्सच्या मायक्रोफोनसह फ्रंट आणि रियर कॅमेराच्या माध्यमातून आजूबाजूला नजर ठेवली जात आहे.
  • तसेच युजर्सच्या एसएमएस आणि मल्टीमीडिया मेसेजच्या कंटेंटसह कॉल लॉग देखील पाहिले जात आहेत.
  • इतकेच नव्हे तर ह्या व्हायरसच्या माध्यमातून युजरच्या स्मार्टफोनमधून एसएमएस पाठवले जात आहेत आणि इनकमिंग एसएमएस ब्लॉक केले जात आहेत.
  • ऑटोमॅटिक फोन कॉल्स केले जात आहेत.
  • हा व्हायरस स्क्रीनशॉट देखील कॅप्चर करू शकतो.
  • GPS आणि नेटवर्कच्या माध्यमातून ट्रॅक केला जाऊ शकतो.
  • फोनची फाईल सिस्टम देखील मोडिफाय करता येते.

हे देखील वाचा: आयपॅडला टक्कर देण्यासाठी वनप्लस सज्ज; परवडणाऱ्या किंमतीत OnePlus Pad Go टॅबलेटची होऊ शकते एंट्री

बचाव कसा करायचा?

ह्या धोकादायक व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स, मेसेज इत्यादींकडे दुर्लक्ष करा. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मिळणाऱ्या ऑफर इत्यादींच्या जाळ्यात अडकू नका आणि तुमच्या फोनमध्ये फक्त वेरिफाइड अ‍ॅप्सच डाउनलोड करा. फोनमध्ये अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी फक्त Google Play Store चा वापर करा. फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन ‘Install From Unknown Sources’ वॉल ऑप्शन चुकूनही ऑन करू नका.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.