Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
OneNorma नावाच्या ‘एक्स’ युजरनं सार आगामी OnePlus Pad Go चे जवळपास सर्व प्रमुख फीचर्स लीक करण्याचा दावा केला आहे. त्यानुसार वनप्लस टॅबमध्ये ८०००एमएएचची बॅटरी असेल. तसेच नवीन वनप्लस पॅड गो दोन मॉडेलमध्ये सादर केला जाईल. वायफाय ओनली मॉडेलचा नंबर ओपीडी२३०५ आहे, तर सेल्युलरला सपोर्ट असेलल्या टॅबचा मॉडेल नंबर ओपीडी२३०४ आहे.
हे देखील वाचा: आयफोनला टक्कर देण्यासाठी Xiaomi 13T आणि Xiaomi 13T Pro मैदानात; बॅटरीची काळजी घेण्यासाठी खास सिस्टम
लीकमध्ये दावा करण्यात आला आहे की OnePlus Pad Go ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज ऑप्शनसह येईल. हा १२८ जीबी स्टोरेजसह देखील येऊ शकतो. ह्या पॅड मध्ये मीडियाटेकचा हीलियो जी९९ प्रोसेसर असेल आणि ८-८ मेगापिक्सलचे फ्रंट व रियर कॅमेरा देण्यात येतील.
OnePlus Pad Go मधील ८ हजार एमएएचची बॅटरी चार्ज करण्यासाठी USB-C पोर्ट दिला जाईल. कंपनीनं आधीच सांगितलं आहे की वनप्लस पॅड गो मध्ये ११.३५ इंचाचा एलसीडी पॅनल असेल जो २.४के रेजॉलूशनला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा: Vodafone Idea ची धमाल ऑफर! मोफत विमानाचं तिकीट आणि ५०जीबी पर्यंत बोनस डेटा मिळवण्याची संधी
नवीन वनप्लस टॅबमध्ये डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह ४ स्पिकर दिले जातील. हा अँड्रॉइड १३ ओएसवर चालू शकतो, ज्यावर कंपनीच्या ऑक्सीजनओएसची लेयर असेल. काही महिन्यांपूर्वी नवीन वनप्लस पॅडची माहिती समोर आली होती. त्यानंतर कंपनीनं कन्फर्म केलं होता की OnePlus Pad Go टॅबलेट ६ ऑक्टोबरला भारतात लाँच केला जाईल. हा OnePlus Pad पेक्षा कमी किंमतीत लाँच केला जाईल.