Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई’ येथे विविध पदांची भरती! आजच करा अर्ज..

8

Bombay College of Pharmacy Bharti 2023: फार्मसी मध्ये तुम्ही उच्च शिक्षण प्राप्त केले असेल आणि उत्तम संधीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. मुंबई येथील बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीने भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांच्या एकूण ०४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून १० ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठीची पात्रता, वेतन आणि अर्ज करण्याची याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:

पदाचे नाव आणि पदसंख्या:
प्राचार्य – ०१ जागा
प्राध्यापक – ०१ जागा
सहयोगी प्राध्यापक – ०१ जागा
सहायक प्राध्यापक – ०१ जागा
एकूण पदसंख्या – ०४ जागा

(वाचा: ESIS Pune Recruitment 2023: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांची भरती! वेळ न दवडता लगेच करा अर्ज)

शैक्षणिक पात्रता/ वेतन: मुंबई विद्यापीठाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांची शैक्षणिक अर्हता तसेच अनुभव ग्राह्य धरला जाईल. या पदांचे वेतनही विद्यापीठ नियमांनुसारच ठरवले जाईल.

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: चेअरमन, गव्हर्निंग बॉडी ऑफ, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, सुंदर नगर, सी.एस.टी. रोड, कालिना, सांताक्रूझ (पू), मुंबई – ४०००९८

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० ऑक्टोबर २०२३

अधिकृत वेबसाईट: https://www.bcp.edu.in/

या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी ”या” लिंकवर क्लिक करावे.

अर्ज कसा करावा: या भरतीकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे. अर्ज करताना त्यात कोणीतीही त्रुटी आढळता कामा नये. अपूर्ण अर्ज स्वीकारला जाणार नाही. तसेच अंतिम तारखे नंतर म्हणजेच १० ऑक्टोबर नंतर प्राप्त झालेले अर्ज देखील ग्राह्य धरले जाणार नाहीत.

(वाचा: SAI Recruitment 2023: भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत मोठी भरती! जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील…)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.