Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पर्सनल गुगल अकाऊंटसाठी पासकीज
पासकीज म्हणजे काय? तुमचं डिवाइस अनलॉक करण्यासाठी वापरले जाणारे फिंगरप्रिंट, फेस स्कॅन किंवा पिन म्हणजे पासकीज. ‘पासवर्डलेस’ भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी गुगलनं ही सिस्टम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्यामुळे कठीण पासवर्ड लक्षात ठेवण्याचं झंझट राहणार नाही. पासकीजच्या मदतीनं तुम्ही पासवर्ड न टाकता सहज तुमच्या गुगल अकाऊंटमध्ये लॉगिन करू शकता.
हे देखील वाचा: नंबर सेव्ह न करता WhatsApp मेसेज कसा पाठवायचा? जाणून घ्या सोपी पद्धत
गुगल अकाऊंटसाठी पासकी कशी सेटअप करायची
गुगल लवकरच युजर्सना पासकीज बनवण्यास आणि वापरण्यास सांगेल. हे फिचर वापरण्यासाठी:
- तुमच्या गुगल अकाऊंटवर जा आणि ‘सिक्योरिटी’ टॅब ओपन करा.
- तिथे तुम्हाला स्टार्ट युजींग पासकीजचा पर्याय दिसेल.
- त्याची निवड करा आणि तुमच्या डिवाइसचं डीफॉल्ट ऑथेंटिकेशन तुमची पासकी बनेल.
- ह्यात फेस अनलॉक (फेस आयडी), फिंगरप्रिंट आणि पिनचा देखील समावेश करण्यात आला आहे.
जर तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा पीसीवरून एखाद्या वेबसाइटवर लॉगिन करू पाहत असाल तर तुम्हाला तुमचा मोबाइल जवळ बाळगावा लागेल. गुगल तुम्हाला तुमचा फोन अनलॉक करण्यास सांगेल आणि मग तुम्ही वेबसाइटवर साइन इन करू शकाल.
हे देखील वाचा: भूकंप येण्यापूर्वीच मिळेल अलर्ट, फक्त अँड्रॉइड फोनमध्ये ऑन करा ‘ही’ सेटिंग
पासवर्ड बंद होणार नाही
गुगल पासवर्ड पूर्णपणे हटवत नाही आहे आणि हे फक्त नवीन सिक्योरिटी फिचर आहे. त्यामुळे तुम्ही पासवर्ड वापरणं सुरु ठेऊ शकता आणि गुगल अकाऊंटमध्ये ‘स्किप पासवर्ड व्हेन पॉसिबल’ पर्याय निवडून पासकीज फिचर बंद देखील करू शकता. हा तुमच्या गुगल अकाऊंटमध्ये डीफॉल्ट पर्याय असेल.