Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘बीईएमएल’ मध्ये ‘गट क’च्या १०० हून अधिक पदांची भरती; जाणून घ्या सर्व तपशील

9

BEML Recruitment 2023: भारत सरकारच्या अंतर्गत येणारी ‘बीईएमएल’ ( Bharat Earth Movers Limited) ही देशातील महत्वाची कंपनी मानली जाते. या कंपनीद्वारे रेल्वे, संरक्षण किंवा देशातील अन्य सेवेतील यंत्रे, सुटे भाग यांची निर्मिती केली जाते. ‘बीईएमएल’ ने नुकतीच भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत त्यांच्या विविध युनिट्स साठी डिप्लोमा ट्रेनी, आयटीआय ट्रेनी तसेच स्टाफ नर्स यांची भरती करण्यात येणार आहे.

एकूण ११९ जागांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीबाबत अधिसूचना जाहीर झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून यामधील पदे, पात्रता, वयोमर्यादा, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती पाहूया.

‘बीईएमएल भरती २०२३’ मधील पदे आणि पात्रता:

डिप्लोमा ट्रेनी-मेकॅनिकल – ५२ जागा
डिप्लोमा ट्रेनी-इलेक्ट्रिकल – २७ जागा
डिप्लोमा ट्रेनी-सिव्हील – ७ जागा
आयटीआय ट्रेनीज-मशिनिस्ट – १६ जागा
आयटीआय ट्रेनीज-टर्नर – १६ जागा
स्टाफ नर्स – १ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ११९ जागा

(वाचा: Sassoon Hospital Pune Bharti 2023: ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे प्राध्यापक पदांची भरती; आजच करा अर्ज)

पात्रता:
‘डिप्लोमा ट्रेनी’ या प्रकारातील पदांसाठी संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. राखीव प्रवर्गाल ५५ टक्के गुण आवश्यक आहेत.

‘आयटीआय ट्रेनी’ या प्रकारातील पदांसाठी संबंधित ट्रेडमधील आयटीआय नॅशनल अ‍ॅप्रेंटिस सर्टिफिकेट अभ्यासक्रम ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. राखीव प्रवर्गाल ५५ टक्के गुण आवश्यक आहेत.

‘स्टाफ नर्स’ पदासाठी ‘बी.एस्सी.’ नर्सिग किंवा ३ वर्षांचा डिप्लोमा इन नर्सिग अ‍ॅण्ड मिडवायफरी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गाल ५५ टक्के गुण आवश्यक आहेत.

वयोमर्यादा:
‘डिप्लोमा ट्रेनी’ आणि ‘आयटीआय ट्रेनी’ संवर्गातील सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादा २९ वर्षे आहे तर ‘स्टाफ नर्स’ या पदासाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे. सर्व पदांच्या कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गाला ३ वर्षे तर एससी/ एसटी प्रवर्गाला ५ वर्षे सवलत आहे.

वेतन श्रेणी:
डिप्लोमा ट्रेनी – २३ हजार ९१० ते ८५ हजार५७०
आयटीआय ट्रेनी – १६ हजार ९०० ते ६० हजार ६५०
स्टाफ नर्स – १८ हजार ७८० ते ६७ हजार ३९०

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १८ ऑक्टोबर २०२३ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता ‘बीईएमएल’च्या अधिकृत वेबसाईला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीसंदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा: BMC LTMGH Bharti 2023: मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये ‘स्वच्छता निरिक्षक’ पदासाठी भरती; आजच करा अर्ज)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.