Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

संगीत क्षेत्रात संधी! कला अकादमी गोवा येथे विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

9

Art Academy Goa Recruitment 2023: संगीत क्षेत्रामध्ये प्रशिक्षक म्हणून नोकरीच्या शोधात असाल आणि गोव्यामध्ये काम करण्याची तयारी असेल तर तुमच्यासाठी एक खास संधी चालून आली आहे. ‘कला अकादमी गोवा’ यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. नुकतीच याबाबत अकादमीने जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या भरतीद्वारे कला अकादमीतील संगीत विभागातील प्रशिक्षक पदाच्या काही महत्वाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये ‘पाश्चात्य संगीत विभागाचे संचालक पद, संगीत प्रशिक्षक आणि बासरी प्रशिक्षक या पदांच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून २६ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीसाठीची पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया याची सविस्तरी माहिती पाहूया.

‘कला अकादमी गोवा भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
संचालक पाश्चात्य संगीत विभाग – ०१ जागा
संगीत प्रशिक्षक – ०१ जागा
बासरी प्रशिक्षक – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०३ जागा

(वाचा: BEML Recruitment 2023: ‘बीईएमएल’ मध्ये ‘गट क’च्या १०० हून अधिक पदांची भरती; जाणून घ्या सर्व तपशील)

शैक्षणिक पात्रता:
संचालक पाश्चात्य संगीत विभाग – संगीत संयोजन किंवा ऑरकेस्ट्रल डिरेक्क्शन विषयात पदव्युत्तर पदवी.
संगीत प्रशिक्षक वोकल – गंधर्व महाविद्यालयातून संगीत विषयात पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा विशारद पदवी
संगीत प्रशिक्षक बासरी – गंधर्व महाविद्यालयातून संबधित विषयात पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा विशारद पदवी
(या शिवाय अन्य पात्रतेचे निकष आणि अटी जाणून घेण्यासाठी अधिसूचना वाचावी. अधिसूचनेची लिंक खाली नमदू केलेली आहे.)

नोकरी ठिकाण: गोवा

वयोमर्यादा: कमाल ४५ वर्षे

अर्ज पद्धती:
ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता:
कला अकादमी गोवा, अदिलशाह पॅलेस, ओल्ड सेक्रेटरीयट बिल्डिंग, पणजी, गोवा

अर्ज करण्याची शेवटची तारीख:
२६ ऑक्टोबर २०२३

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता ‘कला अकादमी गोवा’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी १ ते सायंकाळी ५.३० या कार्यालयीन वेळेट अदिलशाह पॅलेस, ओल्ड सेक्रेटरीयट बिल्डिंग, पणजी, गोवा या पत्त्यावर उपलब्ध होतील. अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतर अर्ज पूर्ण भरून कागदपत्रांच्या पूर्ततेसह तो २६ ऑक्टोबर २०२३ आधी वरील पत्त्यावर सादर करायचा आहे.

(वाचा: NTPC Recruitment 2023: इंजिनियर्ससाठी महारभरती! ‘एनटीपीसी’ मधील ‘या’ जागांसाठी तातडीने करा अर्ज)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.