Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शिक्षक बनण्यासाठी आता ITEP अनिवार्य; बी.एड फक्त उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी पर्याय

14

ITEP Course To Become A Teacher: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी आता केवळ B.Ed कोर्स करुन चालणार नाही. तर, शिक्षक होण्यासाठी ITEP Course करणे अनिवार्य असणार आहे. नॅशनल काऊंसिल फॉर टीचर एज्युकेशनने (National Council for Teacher Education) हा प्रोग्रॅम तयार केला आहे. या प्रोग्रॅमला ITEP (Integrated Teacher Education Programme) असं नावं देण्यात आले आहे. हा कोर्स चार वर्षांचा असणार आहे.

वास्तविक पाहता B.Ed कोर्स यापुढेही सुरु राहाणार आहे. पण तो केवळ शैक्षणिक भाग असेल. यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PHd करता येणार आहे. पुढच्या काही वर्षात जवळपास सर्व B.Ed महाविद्यालयात ITEP (Integrated Teacher Education Programme) कोर्सचा पर्याय सुरु होणार असल्याचे बोलले जात आहे.

उच्च शिक्षणापासून प्राथमिक शिक्षणापर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केलं जाणार आहे. याअंर्गत शैक्षणिक क्षेत्रात नवे बदल होणार आहेत. यानुसार २०३० पासून चार वर्षांचा बीएड किंवा चार वर्षांचा एकात्मिक शिक्षक कार्यक्रम (ITEP) पदवी अनिवार्य करण्याची तयारी सुरू आहे.

(वाचा : NEET PG प्रवेशाची बनावट नोटीस व्हायरल; MCC ने दिला इशारा)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बालवाडी ते इयत्ता १२ वी पर्यंत शिक्षकांची किमान पात्रता निश्चित करण्यात आली असून, यामध्ये B.A.-B.Ed, B.Sc-B.Ed आणि B.Com-B.Ed यांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या २०२३-२४ या शैक्षणिक सत्रापासून एकूण ४१ विद्यापीठांमध्ये प्रायोगिक तत्तावर चार वर्षांचा बीएड (B.Ed) कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी पुढील आठवड्यात या राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सुरु करेल. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCETE) NEP 2020 च्या शिफारशींनुसार चार वर्षांचा B.Ed कार्यक्रम सुरू केला जाणार आहे.

प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारावर अभ्यासक्रमात प्रवेश दिला जाईल. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून आयटीईपी या ४ वर्षांच्या एकात्मिक शिक्षण कार्यक्रमाच्या पायलट प्रोजेक्टसाठी विद्यापीठांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आता हा नवीन B.Ed कार्यक्रम नवीन शिक्षण मॉडेलनुसार मुलांना शिकवण्यासाठी तयार केला जाणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांमध्ये प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक मोठे पाऊल उचललं आहे. UGC ने सेंट्रल युनिव्हर्सिटी फॅकल्टी रिक्रूटमेंट पोर्टल CU-ही निवड सुरू केली आहे. या पोर्टलच्या मदतीने विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांसह प्राध्यापक पदांसाठी अर्ज करणे सोपे होणार आहे.

(वाचा : AICTE ने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर केले सुधारित वेळापत्रक, काय आहेत महत्त्वाचे बदल जाणून घ्या)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.