Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नागपूर महानगरपालिकेत भौगोलीक तज्ञ सल्लागारांची भरती; थेट मुलाखत पद्धतीने होणार निवड

10

Nagpur Mahanagarpalika Bharti 2023: नागपूर महानगरपालिके अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या नगर रचना विभागांतर्गत भौगोलीक माहिती प्रणालीच्या माध्यमातून विकास योजना तयार करण्यासाठी भौगोलीक तज्ञ सल्लागार आणि भौगोलिक सहाय्यक सल्लागार या पदांची नियुक्ती केली जाणारआहे.

या पदांच्या एकूण १८ रिक्त जागा भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांची थेट मुलाखत घेऊन निवड केली जाणार नाही. यासाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून ३० ऑक्टोबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ही भरती कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात प्रथमतः सहा महिन्या करिता केली जाणार आहे. तेव्हा भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन याची सविस्तर माहिती पाहूया.

‘नागपूर महानगर पालिका भरती २०२३’ मधील पदे आणि पात्रता:
भौगोलीक तज्ञ सल्लागार – ०४ जागा
भौगोलीक सहाय्यक सल्लागार – १४ जागा
एकूण पदसंख्या – १८ जागा

शैक्षणिक पात्रता:
भौगोलीक तज्ञ सल्लागार – कोणत्याही क्षेत्रातील पदवी/ पदव्युत्तर पदवी/ अभियांत्रिकी पदवी आणि संबधित कामाचा आठ वर्षांचा अनुभव
भौगोलीक सहाय्यक सल्लागार – कोणत्याही क्षेत्रातील पदवी/ पदव्युत्तर पदवी/ अभियांत्रिकी पदवी आणि संबधित कामाचा चार वर्षांचा अनुभव

वेतन:
भौगोलीक तज्ञ सल्लागार – ६८ हजार मासिक
भौगोलीक सहाय्यक सल्लागार – ४३ हजार मासिक

(वाचा: CNP Nashik Recruitment 2023: चलन नोट मुद्रणालय नाशिक येथे १०० हून अधिक पदांसाठी भरती; पगारही आहे भरपूर)

नोकरी ठिकाण:
नागपूर

वयोमर्यादा: कमाल ४० वर्षे

अर्ज पद्धती: ऑफलाइन

निवड प्रक्रिया: थेट मुलाखतीद्वारे

मुलाखतीची दिनांक: ०७ नोव्हेंबर २०२३

अर्ज सादर करण्याचा आणि मुलाखतीसाठीचा पत्ता: अतिरिक्त आयुक्त (सामान्य), सिव्हीत लाईन, मनपा, नागपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० ऑक्टोबर २०२३

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘नागपूर महानगर पालिका’ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे. अर्ज करताना अर्जासह आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. अपूर्ण अर्ज तसेच अंतिम मुदती नंतर म्हणजे ३० ऑक्टोबर नंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

(फोटो सौजन्य – नागपूर महानगरमालिका)

(वाचा: EXIM Bank Recruitment 2023: इंडिया एक्झिम बँकेत भरती, जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.