Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या पदाकरिता इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे. ही मुलाखत २६ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे. त्यामुळे मुंबईतील पदवीधार उमेदवारांसाठी ही एक महत्वाची संधी आहे. तेव्हा या भरतीची सविस्तर माहिती पाहूया.
‘शासकीय विधी महाविद्यालय भरती २०२३’ मधील पदे आणि पात्रता
तांत्रिक (IT.) तथा लिपिक – ०१ जागा
एकूण पदसंख्या – ०१ जागा
(वाचा: Nashik Mahanagarpalika Bharti 2023: नाशिक महानगरपालिकेत विविध पदांची भरती, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख)
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वाणिज्य शाखेची पदवी असल्यास प्राधान्य दिले जाईल. टॅली परीक्षा उत्तीर्ण असावी असेच मराठी आणि इंग्रजी टंकलेखन आणि एमएस/सीआयटी किंवा तत्सम कोर्स आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण: मुंबई
निवड प्रक्रिया: मुलाखती द्वारे
मुलाखतीचा पत्ता: शासकीय विधि महाविद्यालय, ए – रोड, चर्चगेट, मुंबई – ४०० ०२०
मुलाखतीची तारीख: २६ ऑक्टोबर २०२३
वेळ: सकाळी ११.०० वाजता
या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई’ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मुलाखत प्रक्रिया: शासकीय विधि महाविद्यालयाच्या या भरतीकरिता थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. मुलाखतीला येण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे. मुलाखतीला येणाऱ्या उमेदवाराने आपले परिचयपत्र आणि सर्व शैक्षणिक कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे.
(फोटो सौजन्य – शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई)
(वाचा: Sangli Rojgar Melava 2023: सांगलीकरांसाठी शासनाचा रोजगार मेळावा; कधी, कुठे जाणून घ्या सर्व तपशील)