Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नुकतीच याबाबत पालिकेने अधिसूचना प्रसिद्ध केली असून या पदांसाठीच्या उमेदवारांची थेट मुलाखत माध्यमातून निवड केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहण्याचे आवाहन पालिकेनेच्या वतीने करण्यात आले आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पात्रता, मुलाखतीची तारीख याबाबत सविस्तर माहिती पाहूया.
‘कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभाग भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
वैद्यकीय अधिकारी – ६९
स्टाफ नर्स (महिला) – ५८
स्टाफ नर्स (पुरुष) – ०८
एकूण रिक्त पदसंख्या – १३५
शैक्षणिक पात्रता:
वैद्यकीय अधिकारी – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून/ विद्यापीठातून एमबीबीएस पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबधित कामाचा अनुभव हवा.
स्टाफ नर्स (महिला/ पुरुष) – बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि जीएनएम कोर्स तसेच बीएससी नर्सिंग उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा:
वैद्यकीय अधिकारी – किमान १८ वर्षे ते कमाल ७० वर्षे
स्टाफ नर्स (महिला/ पुरुष) – किमान १८ वर्षे ते कमाल ६५ वर्षे
(वाचा: Shivaji University Kolhapur Bharti 2023: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात ‘या’ पदांची भरती; आजच करा अर्ज)
वेतन:
वैद्यकीय अधिकारी – ६० हजार मासिक
स्टाफ नर्स (महिला/ पुरुष) – २० हजार मासिक
नोकरीचे ठिकाण: कल्याण
निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता: आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै.शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम)
मुलाखतीची तारीख: ०३ नोव्हेंबर २०२३ (सकाळी ११ वाजता)
अर्ज प्रक्रिया: अर्ज व आवश्यक कागदपत्रे मुलाखतीच्या आधी म्हणजेच ०३ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत स्वीकारले जातील.
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘कल्याण -डोंबिवली महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता थेट मुलाखत माध्यमातून निवड केली जाणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीला येण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे. मुलाखतीस येताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
(वाचा: Work Management Tips: ऑफिसच्या कामांचे उत्तम नियोजन करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा)