Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
AICTE या शिष्यवृत्ती अंतर्गत एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थांमध्ये शिकणाऱ्या GATE आणि CEED विद्यार्थ्यांना दरमहा १२ हजार ४०० रुपयांची पदव्युत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते.
एआयसीटीई पीजी स्कॉलरशिप २०२३ चे उद्दिष्ट भारतातील तांत्रिक शिक्षणाची प्रगती करणे आहे. GATE / CEED परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवारच शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. अधिकृत सूचनेनुसार, फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२३ ही ठरवण्यात आली आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे एआयसीटीईच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
(वाचा : NIFT 2024 Registration: एनआयएफटीसाठी अर्ज प्रक्रियेला या दिवसापासून सुरुवात; संपूर्णता ऑनलाइन पार पडणार निवड प्रक्रिया)
फॉर्मच्या संदर्भात माहिती देताना, एआयसीटीईच्या वतीने सांगण्यात आले आहे की, “सर्व पात्र विद्यार्थी त्यांची माहिती ३० नोव्हेंबर २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी AICTE वेब पोर्टलवर अपलोड करतील आणि संस्था १५ डिसेंबर २०२३ किंवा त्यापूर्वी शिष्यवृत्ती प्राप्त करण्याच्या पात्रतेसाठी विद्यार्थ्यांचा डेटा अपलोड करून, पडताळणी आणि मंजुरी प्रक्रिया पूर्ण करतील.” उमेदवारांनी अर्ज भरताना त्यात संपूर्ण योगी आणि खरी माहिती भरणे अनिवार्य असणार आहे. कारण, चुकीचा भरलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
AICTE शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी :
पायरी 1: उमेदवारांनी प्रथम संस्थेकडून त्यांचा युनिक आयडी गोळा केला पाहिजे आणि नंतर pgscholarship.aicte-india.org वर लॉग इन केले पाहिजे.
पायरी 2: यानंतर तुम्हाला नोंदणी करून फॉर्म भरावा लागेल.
पायरी 3: सर्व स्कॅन केलेले कागदपत्र (आधार कार्ड, GATE/CEED स्कोअर कार्डची प्रत, श्रेणी प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि इतर कागदपत्रे) अपलोड करा.
पायरी 4: फॉर्म सबमिट करा आणि एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
(वाचा : Railway Recruitment 2023: १०वी आणि आयटीआय पास ते थेट पदवीधरांसाठी नोकरीची संधी; भारतीय रेल्वेत खेळाडूंसाठी भरती)