Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ‘या’ पदांसाठी महाभरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

5

Central Bank of India Recruitment 2023: तुम्ही जर पदवीधर असाल आणि बँकेत उत्तम पगाराची नोकरी हवी असेल तर ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ मध्ये मोठी भरती सुरू आहे. या भरती अंतर्गत ‘अधिकारी/ऑफिसर’ पदाच्या एकूण १९२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये विविध विभागातील पदांचा समावेश आहे. नुकतीच सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून १९ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन याबाबत सविस्तर माहिती पाहूया.

‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
अधिकारी/ ऑफिसर – १९२ जागा (यामध्ये लेव्हल १ ते ५ मधील विविध विभागातील अधिकारी पदांचा समावेश आहे)
एकूण रिक्त पदसंख्या – १९२ जागा

शैक्षणिक पात्रता:
संबधित विषयात पदवी/ पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. यासह प्रत्येक पदाची पात्रता आवश्यकतेनुसार वेगळी आहे. याचे सविस्तर तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचनेची लिंक खाली जोडली गेली आहे.

(वाचा: Career Opportunities in Foreign Language: परदेशात मोठ्या पगारची नोकरी हवीय, तर ‘या’ भाषा जरूर शिका)

वेतन:
अधिकारी लेव्हल १ – ३६ हजार ते ६३ हजार ८४० रुपये
अधिकारी लेव्हल २ – ४८ हजार १७० ते ६९ हजार ८१० रुपये
अधिकारी लेव्हल ३ – ६३ हजार ८४० ते ७८ हजार २३० रुपये
अधिकारी लेव्हल ४ – ७६ हजार १० ते ८९ हजार ८९० रुपये
अधिकारी लेव्हल ५ – ८९ हजार ८९० ते १ लाख ३५० रुपये

अर्ज शुल्क:
या भरतीकरिता ८५० रुपये अर्ज शुल्क आहे. तर अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/पीडब्ल्यूबीडी उमेदवार/ महिला उमेदवार यांना केवळ १७५ रूपये शुल्क आकारण्यात आले आहे.

अर्ज पद्धती: ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीकरिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच १९ नोव्हेंबर २०२३ च्या आधी सादर करणे आवश्यक आहे. तसेच अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: MES Pune Bharti: पुण्यातील ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ येथे विविध पदांची भरती; आजच करा अर्ज)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.