Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबई ‘एसएनडीटी’ विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या सर्व तपशील

12

SNDT Women’s University Bharti 2023: महाराष्ट्रातील एक नामवंत विद्यापीठ म्हणून ‘एसएनडीटी’ वुमन्स युनिव्हर्सिटीकडे पाहिले जाते. याच विद्यापीठात भरती सुरू आहे. ‘एसएनडीटी’ म्हणजेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई येथे विशेष भरती राबवण्यात आली आहे. या भरती अंतर्गत प्राचार्य आणि प्राध्यापक अशा दोन पदांच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. एसएनडीटी विद्यापीठाने नुकतीच याबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून २२ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती घेऊया.

‘एसएनडीटी महिला विद्यापीठ भरती २०२३; मधील पदे आणि पदसंख्या:
प्राचार्य – ०१ जागा
प्राध्यापक – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०२ जागा

शैक्षणिक पात्रता:
प्राचार्य – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. तसेच संबधित विषयात पीएचडी आणि संशोधनाचा अनुभव. सहाय्यक प्राध्यापक किंवा सहयोगी प्राध्यापक म्हणून किमान १५ वर्षे अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक.

प्राध्यापक – संबधित विषयात पीएचडी आणि संशोधनाचा किमान १० वर्षे अनुभव. तसेच सहाय्यक प्राध्यापक किंवा सहयोगी प्राध्यापक म्हणून किमान १० वर्षे अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक.

(वाचा: Career In BBA: उत्तम पगार मिळवून देणार्‍या ‘बीबीए’ कोर्स विषयी जाणून घ्या सविस्तर माहिती; ‘या’ आहेत संधी)

वेतन:
प्राचार्य – ३७ हजार ४०० ते ६७ हजार
प्राध्यापक – १ लाख ४४ हजार २००

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कुलसचिव, ‘एसएनडीटी’ महिला विद्यापीठ, आवक-जावक विभाग, ०१, एन. टी. रोड, नवीन मरीन लाइन्स, मुंबई ४०००२०.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘एसएनडीटी महिला विद्यापीठ’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २२ नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: Silvassa Anganwadi Bharti 2023: अंगणवाडी मदतनीस पदासाठी मोठी भरती; आजच करा अर्ज)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.