Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबईच्या ‘केईम’ रुग्णालयात भरती; ‘या’ पदांसाठी आजच करा अर्ज..

10

KEM Hospital Bharti 2023: तुम्ही जर वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतले असेल आणि नोकरीच्या शोधात असाल तर मुंबई मध्ये नोकरीची उत्तम संधी आहे. सेठ जीएस मेडीकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल आणि डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती अंतर्गत संशोधन शास्त्रज्ञ बी, लॅब तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक या पदांच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

नुकतीच याबाबत रुग्णालय प्रशासनाने अधिसूचना जाहीर केली असून या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून १५ नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती पाहूया.

‘सेठ जीएस मेडीकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
संशोधन शास्त्रज्ञ बी (नॉन-मेडिकल) – ०१ जागा
लॅब तंत्रज्ञ – ०१ जागा
संशोधन सहाय्यक – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०३ जागा

वेतन: (मासिक)
संशोधन शास्त्रज्ञ बी (नॉन-मेडिकल) – ५६ हजार आणि इतर भत्ते
लॅब तंत्रज्ञ – २५ हजार
संशोधन सहाय्यक – ३५ हजार

शैक्षणिक पात्रता:
संशोधन शास्त्रज्ञ बी (नॉन-मेडिकल) – संबधित विषयात फर्स्ट क्लास ने पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा संबधित विषयात पीएचडी
लॅब तंत्रज्ञ – बीएससी/ डीएमएलटी/ एमएससी बायोटेक्नोलॉजी
संशोधन सहाय्यक – संबधित विषयातील पदव्युत्तर पदवी

(वाचा: Career In BCA: कम्प्युटरची आवड आहे? मग ‘बीसीए’ मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती: ऑफलाईन

निवड प्रक्रिया: मुलाखती द्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता: डॉ. गीता नटराज, प्रोफेसर एमेरिटस, पीआय-व्हीआरडीएल, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, ७ वा मजला, न्यू एम.एस. बिल्डींग, केईएम हॉस्पिटल, परेल, मुंबई ४०००१२.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘केईएम हॉस्पिटल, मुंबई’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात ‘संशोधन शास्त्रज्ञ बी’ या पदाची अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात ‘लॅब तंत्रज्ञ’ या पदाची अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात ‘संशोधन सहाय्यक’ या पदाची अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १५ नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: Mumbai Custom Recruitment 2023: ‘मुंबई कस्टम विभाग’ येथे विविध पदांची भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.