Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रात अग्रलेखाद्वारे राणे यांच्यावर टीकास्त्र.
- यावरून नारायण राणे यांचे ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र.
- संजय राऊत हे संपादकपदाच्या पात्रतेचे नाहीच- नारायण राणे.
अग्रलेख संजय राऊत . त्यांनी लिहिलेले अग्रलेख आपण किती वाचता आणि खूश होता. एकतर हे काय संपादकपदाच्या पात्रतेचे नाहीच आहेत. एक तर उद्धव ठाकरेजी खूश व्हावेत इतकेच ते लिहितात. मी त्यांना १७ सप्टेंबरनंतर उत्तर देईन.
क्लिक करा आणि वाचा- ‘तुम्ही माझं काही करू शकणार नाही, मी सर्वांना पुरून उरलोय’; राणेंचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
पाहा, याच शिवसेनेने मला मुख्यमंत्री बनवले. मी जर गँगस्टर होतो, तर मी मुख्यमंत्री चालतो का?… असे असेल तर मग आताही तेच असतील. जे मंत्री आहेत ते तेच असतील मग. मला संजय राऊत यांच्यावर प्रतिक्रिया द्यावी असे वाटत नाही. मी त्यावर प्रतिक्रिया योग्य वेळी त्यांचे समाधान होईल अशी प्रतिक्रिया देईन, असे राणे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- युवा सेनेच्या वरुण सरदेसाईंविरोधात मनसे आक्रमक; दिली ‘ही’ उपमा
सामनाच्या अग्रलेखात काय म्हटले आहे?
‘नारायण राणे हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. ही सर्व शिवसेना या चार अक्षरांची कमाई आहे. मी नॉर्मल माणूस नाही, असे त्यांनी जाहीर केले. मग ते एॅबनॉर्मल आहेत काय ते तपासावे लागेल,’ असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- राणे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर मला PMO मधून फोन आला: विनायक राऊत
‘भोकं पडलेला फुगा’ असा राणेंचा अग्रलेखात उल्लेख
सामना या मुखपत्राच्या अग्रलेखात म्हटले आहे की, ‘नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा व विधानसभा मिळून चार वेळा दणकून पराभव शिवसेनेनं केला आहे. त्यामुळं राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल. हा फुगा कितीही हवा भरुन फुगवला तरी वर जाणार नाही. पण भाजपने सध्या हा भोकवाला फुगा फुगवून दाखवण्याचे ठरवले आहे. राणे यांना काही लोक डराव डराव करणाऱ्या बेडकाचीही उपमा देतात.’