Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात भरती, ‘या’ पदांसाठी आजच करा अर्ज

9

Chandrapur Mahanagarpalika Bharti 2023: तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतले असेल आणि चंद्रपूर मध्ये नोकरी करण्याची तयारी असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. नुकतीच याबाबत पालिकेने अधिसूचना जाहीर केली आहे.

या भरतीद्वारे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स आणि एएनएम या पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून २१ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

‘चंद्रपूर शहर महानगरपालिका भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) – ०५ जागा
मायक्रोबायोलॉजिस्ट – ०१ जागा
लॅब टेक्निशियन – ०१ जागा
स्टाफ नर्स – ०१ जागा
एएनएम – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या: १० जागा

(वाचा: NHM Sindhudurg Bharti 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी भरती, जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार भिन्न असून त्याचे तपशील महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दिले आहेत. संकेतस्थळाची लिंक खाली जोडली आहे.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, ३ रा माळा, गांधी चौक, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ नोव्हेंबर २०२३

निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘चंद्रपूर शहर महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २१ नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज तसेच ऑफलाइन वगळता इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पालिकेच्या संकेतस्थळावरील अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: LTMGH Hospital Bharti 2023: मुंबईच्या सायन हॉस्पिटल मध्ये ‘या’ पदांची भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.