Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सोलापूर महानगरपालिकेत महाभरती; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

9

Solapur Mahanagarpalika Recruitment 2023: सोलापूरकरांसाठी एक सुवर्णसंधी आहे. सोलापूर महानगरपालिका यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य अग्निशामक अधिकारी, पशु शल्य चिकीत्सक, पशु वैद्यकीय अधिकारी, उद्यान अधिक्षक, लिपीक, सुरक्षारक्षक, फायरमन या आणि अशा अनेक संवर्गातील एकूण २२६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

नुकतीच याबाबत सोलापूर महानगर पालिकेने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ३० नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे. पदसंख्या, पात्रता, अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.

‘सोलापूर महानगर पालिका भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
पर्यावरण संवर्धन अधिकारी – ०१ जागा
मुख्य अग्निशामक अधिकारी – ०१ जागा
पशु शल्य चिकीत्सक/पशु वैद्यकीय अधिकारी -०१ जागा
उद्यान अधिक्षक – ०१ जागा
क्रीडाधिकारी – ०१ जागा
जीवशास्त्रज्ञ – ०१ जागा
महिला व बालविकास अधिकारी – ०१ जागा
समाज विकास अधिकारी – ०१ जागा
कनिष्ठ अभियंता – ०७ जागा
सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी – ०१ जागा
सहाय्यक उद्यान अधिक्षक – ०१ जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ०२ जागा
आरोग्य निरीक्षक – १० जागा
स्टेनो टायपिस्ट – ०२ जागा
मिडवाईफ – ५० जागा
नेटवर्क इंजिनिअर – ०१
अनुरेखक (ट्रेसर) – ०२ जागा
सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ०१ जागा
फायर मोटार मेकनिक – ०१ जागा
कनिष्ठ श्रेणी लिपीक – ७० जागा
पाईप फिटर व फिल्टर फिटर – १० जागा
पंप ऑपरेटर – २० जागा
सुरक्षारक्षक – ०५ जागा
फायरमन – ३५ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – २२६ जागा

(वाचा: CMC Chandrapur Recruitment 2023: चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात भरती, ‘या’ पदांसाठी आजच करा अर्ज)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार भिन्न असून त्याचे सविस्तर तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

नोकरी ठिकाण: सोलापूर

वयोमर्यादा: किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमार्यादेत ०५ वर्षांची सवलत आहे.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी १ हजार रुपये तर इतर सर्व प्रवर्गाकरीता ९०० रुपये अर्जशुल्क आहे.

अर्ज पद्धती: ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘सोलापूर महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा: NHM Sindhudurg Bharti 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी भरती, जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.