Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘आयआयटी बॉम्बे’ मध्ये ‘या’ महत्वाच्या पदासाठी भरती, वेतन पाहून थक्क व्हाल

40

IIT Bombay Director Recruitment 2023: शिक्षण क्षेत्रातील अत्यंत नामांकित मानल्या जाणार्‍या ‘आयआयटी’ बॉम्बे म्हणजेच भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे एका महत्वाच्या पदासाठी भरती राबवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालया अंतर्गत ही भरती होणार आहे. ‘आयआयटी बॉम्बे’च्या संचालक या अत्यंत महत्वाच्या पदासाठी ही भरती होणार आहे,

नुकतीच केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून ३० नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.

‘भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
संचालक – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – -०१ जागा

शैक्षणिक पात्रता: उमेदवार अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवीधर आणि पीएचडी धारक हवा. विज्ञान, गणित किंवा व्यवस्थापन विषयातून पीएचडी असलेले उमेदवार देखील ग्राह्य धरले जातील. संबधित प्रशासकीय कामाचा ०५ वर्षांचा अनुभव तर १० वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असावा.

(वाचा: TMC Mumbai Recruitment 2023: दहावी पास उमेदवारांसाठी टाटा मेमोरियरल सेंटर, मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी)

वेतन: २ लाख २५ हजार आणि इतर भत्ते (मासिक)

नोकरी ठिकाण: मुंबई

वयोमर्यादा: कमाल वयोमर्यादा ६० वर्षे

अर्ज पद्धती: ऑफलाइन

निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता: अवर सचिव (TS.1), उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय, कक्ष क्रमांक ४२८, “सी” विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली- ११०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘केंद्र सरकारचे शिक्षण मंत्रालय’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: NIV Pune Recruitment 2023: पुण्यातील ‘एनआयव्ही’ इन्स्टिट्यूटमध्ये विविध पदांची भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.