Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘इरकॉन इंटरनॅशनल’मध्ये ‘या’ पदांसाठी भरती, जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

8

IRCON Recruitment Limited 2023: तुम्ही हिंदी भाषेमध्ये आणि एचआर मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असेल आणि उत्तम नोकरीच्या शोधात असाल तर इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे हिंदी अनुवादक, हिंदी सहाय्यक आणि एचआर सहाय्यक या पदांच्या एकूण ०७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच ‘इरकॉन’ने याबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

या पदांकरिता इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून २४ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
हिंदी अनुवादक – ०१ जागा
हिंदी सहाय्यक – ०१ जागा
एचआर सहाय्यक – ०५ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०७ जागा

शैक्षणिक पात्रता: संबधित पदाशी निगडीत पदव्युत्तर पदवी आणि हिन्दी – इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान आणि आवश्यक कौशल्ये. ( शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार पात्रता भिन्न असून त्याचे तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.)

(वाचा: GMC Alibag Bharti 2023:अलिबागच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील)

वेतन: (मासिक)
हिंदी अनुवादक – ४० हजार
हिंदी सहाय्यक – ३५ हजार
एचआर सहाय्यक – ४० हजार

अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जेजीएम/एचआरएम, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड, सी-४, जिल्हा केंद्र, साकेत, नवी दिल्ली – ११००१७.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २४ नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: ANM Bharti Satara 2023: सातार्‍यात परिचारिकांसाठी भरती; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.