Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नुकतीच याबाबत असोसिएशनच्या वतीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन म्हणजेच ई-मेल पद्धतीने करायचा असून २९ नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पद, त्यासाठीची पात्रता, अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
लिपिक – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या ०१ जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच एमएस-सीआयटी किंवा त्या समकक्ष कोर्स पूर्ण केलेला असावा. बँकिंग संबधित पदवी असल्यास प्राधान्य दिले जाईल.
(वाचा: ANM Bharti Satara 2023: सातार्यात परिचारिकांसाठी भरती; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख)
नोकरी ठिकाण: घुलेवाडी
वयोमर्यादा: किमान २२ ते कमाल ३५ वर्षे
अर्ज शुल्क: लेखी परीक्षा शुल्क रु.८०० रुपये अधिक १८% जी. एस. टी. असे एकूण रु.९४४ रुपये.
अर्ज पद्धती: ऑनलाइन / ई-मेल द्वारे
अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता: pba.recruit.sbtasb@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ नोव्हेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन म्हणजेच ई-मेल पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २९ नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: IRCON Recruitment 2023: ‘इरकॉन इंटरनॅशनल’मध्ये ‘या’ पदांसाठी भरती, जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)